लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारची आणखी एक मोठी अट, सविस्तर माहिती एका क्लिकवर

मुंबई तक

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झालेला दिसून येत आहे. काही बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी सरकारने महत्त्वाचा नियम लागू केलाय. लाभार्थी महिलांना पतीचं तसेच मुलींना वडिलांचे ई केवायसी जोडण बंधनकारक असणार असल्याचा राज्य सरकारने सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेच्या नियमावलीत बदल

point

पतीचे किंवा वडिलांचे ई केवायसी जोडणं बंधनकारक

point

समजून घ्या एकूण प्रोसेस

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला भरघोस मतं मिळाली होती. पण, राज्य सरकारने राबविलेल्या या योजनेचा अनेक गैर लाभार्थ्यांनी फायदा घेतलेला दिसून आला होता. आता याचपार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर मोहीम सुरु केली आहे. या बोगस लाभार्थ्यांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. अशातच आता याच लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झालेला दिसून येत आहे. काही बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी सरकारने महत्त्वाचा नियम लागू केलाय. लाभार्थी महिलांना पतीचं तसेच मुलींना वडिलांचे ई केवायसी जोडण बंधनकारक असणार असल्याचा राज्य सरकारने सांगितलं आहे.

हे ही वाचा : गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात, रिक्षांना धडक देत 3 जण गंभीर जखमी, अपघातादरम्यान ती...

लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्य्यांसोबत त्या महिलेचे पती किंवा वडिलांच्या वार्षिक उत्पन्न किती आहे, याचीही आता राज्य सरकार पडताळणी करणार आहे. अशातच जर विवाहितेच्या पतीचं किंवा वडिलांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख असेल तर अशा महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा नवीन नियम सांगतो.

सरकार एकूण कौटुंबिक उत्पन्न तपासणार आहेत, आणि जे पात्र आहेत त्यांनाच त्याचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी लाभार्थी महिलांचे उत्पन्न शोधण्याचे काम सुरु होते. मात्र, त्यात गृहिणी आणि बहुतांश महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आढळले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी बंधनकारक केलेय.

असा भरा फॉर्म : 

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp