गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात, रिक्षांना धडक देत 3 जण गंभीर जखमी, अपघातादरम्यान ती...
Gautami Patil Car Accident : गौतमी पाटीलच्या वाहनाचा मुंबई बंगळूरू महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला, नेमकं काय घडलं जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात

नेमकं काय घडलं?
Gautami Patil Car Accident : गौतमी पाटील हे नाव गेल्या काही वर्षांपासून नाच गाण्यामुळे चर्चेत आले. सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे अनेक रिल्स व्हायरल होत असतात, एक स्टेज डान्सर म्हणून तिने राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौतमी पाटील ही अनेकदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते, पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाचा मुंबई बंगळूरू महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला.
हे ही वाचा : डोंबिवली हादरलं! तीन वर्षाच्या चिमुरडीसह मावशीला सर्पदंश, विवाहाची ठरली होती तारीख, नंतर रुग्णालयात जाताच...
अपघातात 3 जण गंभीर जखमी
या अपघातात गौतमी पाटीलच्या वाहन चालकाने घटनास्थळावर उभ्या असलेल्या रिक्षाचा जोरदार धडक दिली होती. या धडकेत रिक्षाचं नुकसान झालं असून रिक्षाचं मोठं नुकसान झालं. तसेच रिक्षाचालकांसह 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्यावर आता उपचार सुरु असून सिंहगड रोड पोलीस या एकूण घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
अपघातादरम्यान गौतमी पाटील...
गौतमीच्या वाहन चालकाला आपल्या वाहनाचा वेग सावरता आला नसल्याने त्याने तीन रिक्षांना ठोकर दिल्याचं सांगण्यात येतंय. या अपघाताचे फोटो आता समोर आले आहेत. फोटोवरून अपघाताच्या भीषणतेचा अंदाज लक्षात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील ही कारमध्ये नव्हती असे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यात 'या' तारखेला निर्माण होणार विष योग, काही राशीतील लोक येणार अडचणीत, नेमकं करावं काय? वाचा
अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा कार आणि ड्रायव्हर हे त्याच ठिकाणी होते आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरु केली, त्याचवेळी ही गाडी गौतमी पाटीलची असल्याचं सांगण्यात येत आहे.