डोंबिवली हादरलं! तीन वर्षाच्या चिमुरडीसह मावशीला सर्पदंश, विवाहाची ठरली होती तारीख, नंतर रुग्णालयात जाताच...
Dombivli News : डोंबिवलीत मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. आजादे गावात एका तीन वर्षीय प्राणवी आणि तिची मावशी श्रुती ठाकूर यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने दुर्देवी अंत झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोंबिवलीत मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना
एकाच कुटुंबात दोघींचा मृत्यू
Dombivli News : डोंबिवलीत मन सुन्न करून टाकणारं धक्कादायक घटना समोर आलं आहे. आजादे गावात एका तीन वर्षीय प्राणवी आणि तिची मावशी श्रुती ठाकूर यांचा सर्पदंशाने दुर्देवी अंत झाला. महत्त्वाची बाब म्हणजे श्रुती ठाकूरचा पुढील महिन्यात विवाह होता. परंतु नियतीने होत्याचं नव्हतं केलं आणि एकासोबत दोन जीव गेले. या घटनेनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर, रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबियांनी केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या कार्यालयासमोरच धरणे आंदोलन केले, या घटनेनं आणि आंदोलनामुळे तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली.
हे ही वाचा : गणेश घायवळने पोलिसांना गुंगारा दिला, आधी लंडन, तर आता स्वित्झर्लंडमध्ये जाऊन बसला, गुन्हे दाखल तरीही पासपोर्ट ...
रविवारी सकाळी झोपेत असताना चिमुरड्या प्राणवीला सर्पदंश केला. त्यानंतर ती रडू लागली आणि तेव्हाच मावशी श्रुतीने प्राणवीला उचलून घेतले आणि आईकडे दिले. प्रकृती बघता तातडीने दोघांनाही केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.
भाची आणि मावशीचा सर्पदंशाने मृत्यू
डॉक्टरांनी प्रकृती अगदी स्थिर असल्याचं सांगितलं, पण नंतर प्राणवीची प्रकृती बिघडली आणि तिला ठाणे सिव्हिलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, प्राणवीचा मृत्यू झाला. तसेच श्रुतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, परंतु तिचाही रात्री मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आहे. या घटनेनं डोंबिवलीतील आजदे गावात शोक व्यक्त केला जात आहे.
या एकूण घटनेनंतर डोंबिवली महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुक्ला यांनी सांगितलं की, सर्पदंश झाल्यानंतर मुलीवर उपचार सुरु होते, तिला लस देखील देण्यात आली होती. मात्र, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आयसीयु वॉर्ड नसल्याने तिचा मृत्यू झाला, यामुळे कुटुंबियांनी रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.










