गणेश घायवळने पोलिसांना गुंगारा दिला, आधी लंडन, तर आता स्वित्झर्लंडमध्ये जाऊन बसला, गुन्हे दाखल तरीही पासपोर्ट कसा भेटला?
Pune Crime : गुंड निलेश घायवळने 90 दिवसांच्या व्हिसावर थेट स्वित्झर्लंडल गाठल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगरातून त्याने पासपोर्ट मिळवला आणि तो परदेशात गेल्याचं समजतंय, नेमकं प्रकरण काय समजून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गणेश घायवळनं स्वित्झर्लंड गाठलं

'असा' बनवला खोटा पासपोर्ट

पोलिसांनी दिली आतली खबर
Pune Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गँगने कोथरूड भागात किरकोळ वादातून गोळीबार केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता गुंड निलेश घायवळने 90 दिवसांच्या व्हिसावर थेट स्वित्झर्लंडल गाठल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगरातून त्याने पासपोर्ट मिळवला आणि तो परदेशात गेल्याचं समजतंय. गणेश घायवळवर एवढे गुन्हे दाखल असूनही त्याला पासपोर्ट कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित होतो. याचाच आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा : 'लांडग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ', एकाच फ्रेममध्ये बाळासाहेब ठाकरे अन्... शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा 'AI' ट्रेलर घालतोय धुमाकूळ
गणेश घायवळनं लंडन आणि आता स्वित्झर्लंड गाठलं
कोथरूड भागात 17 सप्टेंबर रोजी रात्री 11: 30 वाजताच्या सुमारास घायवळ टोळीतील गुंडांनी एका तरुणावर गोळीबार केला, तेव्हापासून पुन्हा घायवळ गँग एकदा पोलिसांच्या टार्गेटवर आली. या प्रकरणात पोलिसांनी घायवळ गँगमधील काही गुंडांना अटक केली असून त्यांची नावे देखील समोर आली आहेत. ज्यामध्ये, आनंद चांदेलेकर, दिनेश फाटक, गणेश राऊत, रोहित आखडे, मयूर कुंबरेसह इतर जणांना अटक केली आहे. त्यानंतर पोलीस आता गणेश घायवळच्या शोधात आहे, पण त्याने पोलिसांना गुंगारा देऊन आधी लंडन आणि आता स्वित्झर्लंड गाठलं.
अनेक गुन्हे तरी परदेशात गेलाच कसा?
निलेश घायवळवर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याला आहिल्यानगर पोलिसांनी पासपोर्ट दिलाच कसा आसा प्रश्न उपस्थित होतो. निगेटीव्ह अॅड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट येऊनही अवैध पासपोर्ट मिळवत तो लंडनला पळून गेला. पुणे पोलिसांनी गोळीबार केलेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना तो परदेशात गेल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : आई गरबा बघायला गेली, घरात बापानेच लेकीवर केला अत्याचार, तीव्र वेदना होऊ लागल्याने... अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा
संबंधित पासपोर्टबाबत आहिल्यानरचे पोलीस अधीक्षक एसपी सोमनाथ घार्गे म्हणाले की, घायवळने 2019 मध्ये पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात जाऊन तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला. तिथे अर्जामध्ये पासपोर्टसाठीचा पत्ता बदलला. पासपोर्टमध्ये त्याने गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडी रोड, अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) येथील रहिवासी असल्याचं भासवून त्यात खोटी माहिती लिहिली.