आई गरबा बघायला गेली, घरात बापानेच लेकीवर केला अत्याचार, तीव्र वेदना होऊ लागल्याने... अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा
Akola Crime : अकोला शहरात नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावत्र बापानेच आपल्या पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अकोल्यातली खदान पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अकोला शहरात नात्याला काळिमा

आई बाहेर गेली आणि घरात वडिलांनी मुलीसोबत...

भयंकर प्रकार
Akola Crime : अकोला शहरात नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावत्र बापानेच आपल्या पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अकोल्यातली खदान पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. या घटनेनं अकोला शहर हादरून गेलं आहे. या घटनेनं घटनास्थळावरील परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेला काही राशीतील लोकांच्या सर्व समस्या दूर होणार आणि...
आई गरबा पाहण्यासाठी घराबाहेर पडली अन् सावत्र वडिलांनीच...
मिळालेल्या एकूण माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर जाताना तिने आपल्या मुलाला आणि मुलीला वडिलांकडे जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर सावत्र वडिलांनी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांच्या पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. नंतर मुलीला जोराच्या वेदना होऊ लागल्या होत्या, तसेच तिला अस्वस्थता जाणवू लागली होती. आपली आई घरी आल्यानंतर मुलीने तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला.
महिलेनं तिच्या मुलीला अकोल्यातली एका शासकीय रुग्णालयात दाखल केलं आणि तिला अतिदक्षता उपचारगृहात ठेवण्यात आले. या एकूण घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास करण्यास सुरुवात केली. संबंधित प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती खदान पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा : डोंबिवली: भंडाऱ्यात जेवला, हात धुवायला गेला आणि 13 वर्षाचा आयुष गमावून बसला जीव.. असं घडलं तरी काय?
महिला-मुली केवळ सामाजातच नाही,तर घरातही सुरक्षित आहेत का?
अत्याच्याराच्या या गंभीर घटनेनं खदान पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात संतापाची लाट आहे. नागगिरांकडून तसेच काही सामाजसेवी संस्थानाकडून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. नवरात्रौत्सवात देवीची पूजा आर्चा केली जाते, पण याच उत्सवात दुर्गेचं रुप म्हणून महिलांकडे आणि मुलीकडं पाहिलं जातं त्याच लहान चिमुरडीवर अत्याचार झाला. अशा अनेक घटना या देशात घडताना दिसतात. यामुळे आता महिला-मुली केवळ सामाजातच नाही,तर घरातही सुरक्षित आहेत का? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.