डोंबिवली: भंडाऱ्यात जेवला, हात धुवायला गेला आणि 13 वर्षाचा आयुष गमावून बसला जीव.. असं घडलं तरी काय?
Dombivli News : डोंबिवलीतील सरोवर नगर परिसरात लहान मुलगा भंडाऱ्यात जेवणासाठी गेला होता. त्याचं जेवण झाल्यानंतर तो एका उघड्या नाल्याजवळ हात धुण्यासाठी गेला असता, त्या लहान मुलाचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

डोंबिवलीत एक मन हेलावून टाकणारं प्रकरण

नवरात्रीच्या भंडाऱ्यात चीड आणणारा प्रकार

नेमकं काय घडलं?
Dombivli News : डोंबिवलीत एक मन हेलावून टाकणारं प्रकरण समोर आलं आहे. रविवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान, नवरात्रीच्या सुमारास भंडाऱ्यात चीड आणणारा प्रकार समोर आला. डोंबिवलीतील सरोवर नगर परिसरात लहान मुलगा भंडाऱ्यात जेवणासाठी गेला होता. त्याचं जेवण झाल्यानंतर तो एका उघड्या नाल्याजवळ हात धुण्यासाठी गेला असता, त्या लहान मुलाचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. लहान मुलाचं नाव आयुष कदम वय 13 असे नाव होते. या घटनेनं डोंबिवलीतील सरेवर नगर परिसर हादरून गेला.
हे ही वाचा : आधी 50 हजार तर नंतर 6 लाखांची केली मागणी, मुंबईतल्या वकिलाला मसाज करणं पडलं भारी, तरुणांनी न्यूड व्हिडिओ शूट करत नको तेच...
मुलगा चेंबरमध्ये पडला, कुटुंबियांचा टाहो 'कोणीतरी वाचवा...'
संबंधित घटनेची माहिती आयुषच्या मित्रांनी आई व वडिलांना सांगितली. कुटुंबियांनी आरडाओरड करत उपस्थितांना मदतीची मागणी केली होती. आमचा मुलगा नाल्यात पडालाय, कोणीतरी वाचवा, असा टाहो फोडला. पण घटनास्थळी असलेले लोक भंडाऱ्यात मग्न होते. मदतीऐवजी सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते. आयोजकांनी भंडारा सुरुच ठेवला मदतीऐवजी बघ्याची भूमिका घेतली.
रुग्णालयात नेण्यास झाला उशीर
अखेर काही तरुणांना लाजेकाजे पुढाकार घेत अग्निशामन दलाला बोलावले, पण आवश्यक ती साधनसामग्री नसल्याने ते नाल्यात उतरलेच नाहीत. तेव्हा वेदांत जाधव नावाच्या तरुणाने जीवाची बाजी लावत नाल्याच उडी घेतली. सुमारे आर्धा तास शोध घेतल्यानंतर त्याने आयुषला बाहेर काढण्याचे काम केले. कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तोवर फारच उशीर झाला होता. डॉक्टरांनी आयुषला आणण्यास उशीर झाल्याचं सांगितले.
हे ही वाचा : पुण्यात रक्षकचं झाले भक्षक, पोलीस उपनिरीक्षकाचा तरुणीवर आत्याचार, नेमकं प्रकरण काय?
या एकूण घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनं संताप उसळला आहे. केडीएमसी, एमएमआरडीए आणि मंदिर प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे आयुषसारख्या निरपराध मुलाचा जीव गेला, असा नागरिकांचा आरोप आहे.