पुण्यात रक्षकचं झाले भक्षक, पोलीस उपनिरीक्षकाचा तरुणीवर आत्याचार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पीडित तरुणीने पोलीस उपनिरीक्षकावर गंभीर आरोप केलेत.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार

point

तरुणीने पोलीस उपनिरीक्षकावर गंभीर आरोप

Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पीडित तरुणीने पोलीस उपनिरीक्षकावर गंभीर आरोप केलेत. पीएसआयने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून आत्याचार केल्याचा तरुणीने आरोप केला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. मारहाणीसह धमकी देण्याच्या कलमांतर्गत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव अजिंक्य रायसिंग जाधव (वय 32) असे आहे.

हे ही वाचा : अहिल्यानगरातील रस्त्यावर 'l Love Mohammad' रांगोळीवरून वाद, मुस्लिम जमाव एकवटला, पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

खाकी वर्दीला बट्टा

संबंधित प्रकरणात पीएसआय जाधव यांच्यावर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं फुरसुंगी पोलीस दलात एकच खळबळ उडालेली दिसून येत आहे. या घटनेनं खाकी वर्दीला बट्टा लागल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, पीएसआय जाधव हे पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि तक्रारदार तरुणीची 2023 मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर नात्यात झालं. जाधव यांनी तरुणीला लग्नाचं खोटं आमिष दाखवलं. या खोट्या आमिषाचा फायदा घेत त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा पीडितेनं आरोप केला आहे.

हे ही वाचा : जमिनीवरून वाद, पोटच्या लेकानं आई-बापाला लाठीकाठीने हल्ला करत संपवलं, बुलढाण्यात चीड आणणारा प्रकार

तरुणीने उपनिरीक्षक जाधवकडे विवाहबाबतची विचारणा केली. मात्र, लग्नाच्या मागणीनंतर जाधवने तरुणीसोबत विवाह करण्यास स्पष्टपणे नकार दिला. एवढ्यावरच न थांबता लग्नाची मागणी करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. तसेच पीडितेला जीवं मारण्याची धमकीही दिल्याचं तक्रारीत नमूद केलं होतं. ,संबंधित प्रकरणात जाधव यांच्यावर फुरसुंगी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp