जमिनीवरून वाद, पोटच्या लेकानं आई-बापाला लाठीकाठीने हल्ला करत संपवलं, बुलढाण्यात चीड आणणारा प्रकार
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं. एका तरुणाने जमिनीच्या वादातूनच तरुणाने आई वडिलांचा खून केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बुलढाणा जिल्ह्यात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार

जमीन विक्रीवरून लेकानं आई-वडिलांनाच संपवलं

नेमकं काय घडलं?
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री लेकानेच आपल्याच आई-वडिलांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी निखिल निर्मळ यांनी सांगितलं की, किन्ही सवडत नावाच्या गावतील एका तरुणाने जमिनीच्या वादात आपल्याच आई-वडिलांची हत्या केली.
हे ही वाचा : 'आजपासून ही भाची..', भाग्यश्री हॉटेलवाला बाप गमावलेल्या लेकीचा पालक बनला; आर्थिक मदत करण्यासाठी थेट घरी पोहोचला
आई वडील रक्ताच्या थारोळ्यात
या प्रकरणाची पोलिसांना माहिती देण्यात आली असता, 75 वर्षीय मृत वडील महादेव चोपडे आणि त्यांची पत्नी कलावती (वय 70) हे दोघेही घरातील खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर अमडापूर पोलीस अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती घेतली. त्यानंतर आई वडिलांना मृत घोषित केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते.
मृत आई वडिलांच्या थोरल्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, आई-वडील हे दोघेही रागीट स्वभावाचे होते. वडील महादेव चोपडे यांनी दीड-दीड एकर शेती देऊन ठेवली होती आणि त्यापैकी काही जमिनीचा हिस्सा हा आपल्या पत्नीच्या नावावर करून ठेवला होता. त्यानंतर वडिलांनी ती जमीन विकण्यास काढली होती.
हे ही वाचा : पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा त्याच्या सामन्याची फी दहशतवाद्यांना देणार? नेमकं काय म्हणाला?
जमीन विक्रीचा वाद
जमीन विक्रीसाठी मारेकरी मुलगा गणेश चोपडा याला जमीन विकण्यास विरोध दर्शवला, या संदर्भात तो संध्याकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान त्यांना भेटायला गेला, मारेकरी मुलाने जमीन विकू नये असे अनेकदा सांगितले, जमिनीवरून तिघांमध्ये बराच वाद झाला, संतापलेल्या मुलाने आई वडिलांच्या डोक्यावर लाठीकाठीने हल्ला केला असता, त्या हल्ल्यात आई-बाबांचा मृत्यू झाला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित प्रकरणात हत्येची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.