'आजपासून ही भाची..', भाग्यश्री हॉटेलवाला बाप गमावलेल्या लेकीचा पालक बनला; आर्थिक मदत करण्यासाठी थेट घरी पोहोचला

मुंबई तक

Hotel Bhagyashree Marathwada flood : नागेश मडके आणि त्यांचं हॉटेल भाग्यश्री अनेक कारणाने चर्चेत आले होते. पण, आता नागेश मडके यांनी मराठवाड्यातील पूरजन्य परिस्थितीतील लोकांना धीर देत मदतीचं कार्य केलं आहे. 

ADVERTISEMENT

hotel bhagyashree owner nagesh madke help flood victims in marathwada
hotel bhagyashree owner nagesh madke help flood victims in marathwada
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाकडून पूरग्रस्तांना मदत

point

वह्या पुस्तकांचे केलं वाटप

Hotel Bhagyashree Marathwada flood : हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे हॉटेल भाग्यश्रीमुळे चांगलेच चर्चेत आलेत. तसेच त्यांची रिल्सस्टार म्हणूनही ओळख आहे, 'नाद करती का यावच लागतंय', हा त्यांचा देशभर प्रसिद्ध झालेला हटके संवाद सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याने चर्चेत आले होते. पण, आता हेच नागेश मडके आणि त्यांचं हॉटेल भाग्यश्री अनेक कारणाने चर्चेत आले होते. पण, आता नागेश मडके यांनी मराठवाड्यातील पूरजन्य परिस्थितीतील लोकांना धीर देत मदतीचं कार्य केलं आहे. 

हे ही वाचा : पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा त्याच्या सामन्याची फी दहशतवाद्यांना देणार? नेमकं काय म्हणाला?

पूरग्रस्तांना हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाकडून मदतकार्य 

या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थ्याच्या वह्या पुस्तकं वाहून गेल्यानं मोठं शैक्षणिक नुकसान झालं. याचपार्श्वभूमीवर आता नागेश मडके यांनी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप केली आहेत. एवढंच नाही,तर त्यांनी पूरग्रस्तांना धीरही दिला आहे. ते म्हणाले की, "अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेकजण फाशी घेत आहेत, तर त्यांनी फाशी घेऊ नका, कारण लहान मुला बाळांचा संभाळणारं कोण असतं. आपण खचून जायचं नाही. आमच्या सारखे व्यवसायिक तुमच्या मदतीला येतीलच', असे ते म्हणाले. 

ही भाची..

पुढे ते म्हणाले की, 'तुम्ही या आलेल्या संकटाला ताकदीने मिळून समोर जावा. कारण सहा महिने आपल्यावरती संकट आहे, परतचे सहा महिने आपलेच आहेत, पण एकदा का जीव गेला तर परत येत नाही', असे ते म्हणाले होते. तसेच त्यानंतर त्यांनी एका मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की, 'ही भाची आहे. याच मुलीच्या डोक्यावर बापाचं छप्पर नाही, त्यामुळे त्यांना बापाचं महत्त्व कळतंय. त्यामुळे कोणीच असं पाऊल उचलू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे', असे म्हणत त्यांनी हात जोडत पूरग्रस्तांसमोर हळहळ व्यक्त केली. 

हे ही वाचा : Maharashtra हवामानाचा अंदाज: मराठवाड्याला पावसाचा पुन्हा अलर्ट, गरज असेल तरच घरातून बाहेर पडा!

दरम्यान, नागेश मडके यांनी मुंबईतील मराठा मोर्चात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना जेवण, पाण्याची सोय केली होती. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. त्यानंतर ते आता पूरग्रस्तांना मदतीचं कार्य करत असल्याचं बघालया मिळत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp