आधी 50 हजार तर नंतर 6 लाखांची केली मागणी, मुंबईतल्या वकिलाला मसाज करणं पडलं भारी, तरुणांनी न्यूड व्हिडिओ शूट करत नको तेच...
Mumbai Crime : आधी 50 हजार तर नंतर 6 लाखांची केली मागणी, मुंबईतल्या वकिलाला मसाज करणं पडलं भारी, तरुणांनी न्यूड व्हिडिओ शूट करत केलं ब्लॅकमेल केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईमध्ये मसाजच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग

तब्बल एवढे रुपये उकळले
Mumbai Crime : मुंबईमध्ये मसाजच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करत फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मुंबईतील बोरिवलीतील असल्याचं सांगण्यात येत आहे. एका वकिलाला मसाज करण्याची प्रचंड आवड होती. पण, मसाज करणे संबंधित वकिलाला महागात पडले. ज्यांनी वकिलाचा मसाज केला त्यांनी गुप्तपणे त्याचे नग्न व्हिडिओ शूट केला आणि नंतर वकिलाला ब्लॅकमेल करत पैसे उकळले. संबंधित प्रकरणात दोन गुन्हेगारांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे आता समोर आली आहेत. समीर अली हनीफ (वय 21) आणि भूपेंद्र भागवत सिंग (वय 25) अशी आरोपींची नावे समोर आली आहेत.
हे ही वाचा : पुण्यात रक्षकचं झाले भक्षक, पोलीस उपनिरीक्षकाचा तरुणीवर आत्याचार, नेमकं प्रकरण काय?
दोघेजण अटक तर एक फरार
पोलिसांच्या माहितीनुसार, समीर अली हनीफ खान आणि भूपेंद्र भगवान अशी आरोपींची नाव समोर आली आहेत, तर त्यांचा तिसरा साथीदार मनविंदर उर्फ मुन्ना अद्यापही फरार आहे. पोलिसांनी समीरला खेरवाडी येथून तसेच भूपेंद्रला अंधेरीतून अटक करण्यात आली आहे. ही घटना 7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बोरिवली पश्चिम भागातील रहिवासी असलेला तक्रारदार वकील मसाज करायचा. त्यानंतर वकील हा समीर नावाच्या मसाज करणाऱ्या तरुणाशी अधिक संपर्कात आला. सुरुवातीला दोन वेळा समाज केल्यानंतर भूपेंद्र आणि मनविंदर तिसऱ्यांदा समीरसोबत आले. समाज दरम्यान, भूपेंद्रने वकिलाचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवलाय व्हिडिओ बनवल्यानंतर तिन्ही वकिलांनी तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि 50 हजार रुपयांची मागणी केली. वकिलाने पैसे देणार नाही, असे सांगितल्यास बेदम मारहाण केली. बदनामी आणि हिंसाराच्या भीतीने पीडितेनं समील अलीच्या गुगल पे वर 50 हजार रुपये ट्रान्सफर केले होते.
हे ही वाचा : अहिल्यानगरातील रस्त्यावर 'l Love Mohammad' रांगोळीवरून वाद, मुस्लिम जमाव एकवटला, पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
पीडित वकिलाला 6 लाखांची मागणी
काही दिवसानंतर पुन्हा आरोपिंनी वकिलाला फोन करत 6 लाखांची मागणी केली. तेव्हा वकिलांनी पैसे देणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोपी हे वकिलाला सतत फोन करून धमकी देऊ लागले होते. नंतर वकिलांनी आरोपीच्या सततच्या धमकीने त्रस्त होऊन बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भूपेंद्र आणि समीरला अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला.