ही भिवंडी आहे, मराठीची गरज काय? अबू आझमी नेमकं काय म्हणाले?
Abu Azami : ही भिवंडी आहे, मराठीची गरज काय? असं समाजवादी पक्षाचे माणखुर्दचे आमदार अबूू आझमी म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ही भिवंडी आहे, मराठीची गरज काय?

पत्रकारांशी बोलताना अबू आझमींचं वक्तव्य
Mumbai : समाजवादी पक्षाचे माणखुर्दचे आमदार अबू आझमी त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अबू आझमी भिवंडीत पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले होते. तेव्हा पत्रकारांनी अबू आझमींना मराठीत बोलण्याचा आग्रह केला. मात्र, अबू आझमींनी मराठी बोलण्यास नकार दिलाय. दरम्यान, ही भिवंडी आहे, इथं मराठीची काय गरज? असंही आझमी यावेळी बोलताना म्हणाले आहेत. आझमींच्या या वक्तव्यानंतर मनसेकडून त्यांना कडक शब्दात इशारा देण्यात आलाय. अबू आझमी नेमकं काय म्हणाले? आणि मनसेकडून त्यांना काय प्रत्युत्तर देण्यात आलं? सविस्तर जाणून घेऊयात...
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारची आणखी एक मोठी अट, सविस्तर माहिती एका क्लिकवर
"मराठी बोलायची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईल उत्तर देणार"
मराठी आणि हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीत बोलू शकतो, पण ही भिवंडी आहे, मराठीची गरज काय आहे? मी मराठीत बोललो तर दिल्लीतील लोकांना हे समजणार नाही. उत्तर प्रदेशातील लोकांना मी काय बोललो हे समजणार नाही, असं अबू आझमी म्हणाले. यावर आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. "अबू आझमी तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करता. महाराष्ट्रात राजकारण करत असताना उत्तर प्रदेशातील भय्याची तुम्हाला काळजी वाटते काय? भिवंडी महाराष्ट्रात आहे आणि इथे मराठीच चालणार आहे. तुम्हाला मराठी बोलायला लाज वाटत असेल तर तुम्हाला मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल", असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय.