केक कापण्याची तयारी आणि मित्रांचा उत्साह..,पण काही क्षणातच बर्थडे बॉय रक्ताच्या थारोळ्यात पडला, जागेवर मृत्यू!
Crime News : मृत मुलाचे नाव उनैज असून तो इयत्ता सातवीत शिकत होता. सरोजिनी नगर येथील रहिवासी असलेले जमीर खान, जे विजेच्या सामानाचे दुकान चालवतात, त्यांचा उनैज हा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी उनैजचे काही मित्र त्याला घरी बोलावण्यासाठी आले होते. शेजारीच एका मित्राच्या पुतण्याच्या वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून ते त्याला सोबत घेऊन गेले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केक कापण्याची तयारी आणि मित्रांचा उत्साह..
पण काही क्षणातच बर्थडे बॉय रक्ताच्या थारोळ्यात पडला, जागेवर मृत्यू!
Crime News : एकीकडे आनंदाचे वातावरण, केक कापण्याची तयारी आणि मित्रांचा उत्साह... पण काही क्षणातच या आनंदाचे रूपांतर किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्यात झाले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मृत मुलाचे नाव उनैज असून तो इयत्ता सातवीत शिकत होता. सरोजिनी नगर येथील रहिवासी असलेले जमीर खान, जे विजेच्या सामानाचे दुकान चालवतात, त्यांचा उनैज हा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी उनैजचे काही मित्र त्याला घरी बोलावण्यासाठी आले होते. शेजारीच एका मित्राच्या पुतण्याच्या वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून ते त्याला सोबत घेऊन गेले. मात्र, संध्याकाळी 6:30 च्या सुमारास उनैजच्या कुटुंबीयांना एक फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पार्टीमध्ये गोळी चालली असून उनैज गंभीर जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबई-गोवा हायवेचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार... सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट
कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. उनैजचे वडील जमीर खान यांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझ्या मुलाला कट रचून बोलावण्यात आले होते. संजीव त्रिपाठी नावाच्या व्यक्तीच्या पुतण्याच्या पार्टीत त्याला नेले गेले आणि तिथे त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली." मुलाच्या मृत्यूमुळे संपूर्ण खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.










