10×12 ची रुम, आतमध्ये 50 विषारी नाग, सापाकडून चावून घेण्यासाठी 50 हजारांचा रेट, नेमकं प्रकरण काय?
Crime News : अधिकची माहिती अशी की, या प्राण्यांचा वापर केवळ तस्करीसाठीच नाही, तर त्यांचे विष काढून हाय-प्रोफाईल रेव पार्ट्यांमध्ये नशेचा पुरवठा करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी मणिकनंदन नादर नावाच्या 41 वर्षीय मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10×12 ची रुम, आतमध्ये 50 विषारी नाग
सापाकडून चावून घेण्यासाठी 50 हजारांचा रेट, नेमकं प्रकरण काय?
Crime News : गुजरात गुन्हे शाखा आणि वन विभागाने नवरंगपुरा येथील एका निवासी फ्लॅटवर संयुक्त छापा टाकून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी आणि ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. एका छोट्या 10×12 फुटांच्या खोलीत 50 हून अधिक विदेशी साप आणि दुर्मिळ प्राण्यांना अत्यंत क्रूरपणे कोंडून ठेवण्यात आले होते.
अधिकची माहिती अशी की, या प्राण्यांचा वापर केवळ तस्करीसाठीच नाही, तर त्यांचे विष काढून हाय-प्रोफाईल रेव पार्ट्यांमध्ये नशेचा पुरवठा करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी मणिकनंदन नादर नावाच्या 41 वर्षीय मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून हे रॅकेट सापांच्या विषाचा मोठा सौदागर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदाबाद, गांधीनगर आणि खेडा परिसरातील गुप्त रेव पार्ट्यांमध्ये या विषाला मोठी मागणी होती, जिथे एका डोससाठी तब्बल 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम वसूल केली जात असे. नशेसाठी शौकीन लोक सापांकडून स्वतःला चावून घेत किंवा विषाचे काही थेंब थेट शरीरात टोचून घेत असत. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या प्रजातीच्या सापांकडून दंश करून घेण्यासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले होते. या कारवाईत 50 विषारी सापांसह लाल हाताचे टॅमरिन माकड, आफ्रिकन ग्रे पोपट, निळे-सोनेरी मॅकॅओ पोपट, पर्शियन मांजरी आणि नेदरलँडचे बुटके ससे असे दुर्मिळ प्राणी जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा : प्रेयसी म्हणाली, 'तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, 10 लाख रुपये दे..' पुरुषानं विष पिऊन उचललं टोकाचं पाऊल










