चार महिलांसोबत केलं लग्न अन् आई-वडिलांची निर्दयीपणे हत्या! ‘त्या’ एका गोष्टीसाठी रचला मोठा कट, नेमकं प्रकरण काय?
एका व्यक्तीने आधी त्याची पत्नी, आई आणि वडिलांचा विमा काढला. नंतर त्याने त्याच्या कुटुंबियांना म्हणजेच ज्यांच्या नावावर विमा आहे, अशा सदस्यांना एक एक करून मारून टाकलं आणि नंतर त्यांचे विम्याचे पैसे लुटले. पण ही घटना लवकरच उघडकीस आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चार महिलांसोबत केलं लग्न

आई-वडिलांची निर्दयीपणे हत्या!

‘त्या’ एका गोष्टीसाठी रचला मोठा कट
Crime News: जीवन विमा हा आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. जीवनात काही अनपेक्षित घटना घडल्यास या विमा पॉलिसीमुळे आर्थिक मदत मिळते. मात्र, काही लोक या विमा पॉलीसींचा गैरवापर करत असल्याच्या बातम्या समोर येतात. उत्तर प्रदेशातील हापुडमधून एक अशीच बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आधी त्याची पत्नी, आई आणि वडिलांचा विमा काढला. नंतर त्याने त्याच्या कुटुंबियांना म्हणजेच ज्यांच्या नावावर विमा आहे, अशा सदस्यांना एक एक करून मारून टाकलं आणि नंतर त्यांचे विम्याचे पैसे लुटले. पण ही घटना लवकरच उघडकीस आली.
खरंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व विमा कंपन्यांकडून सस्पेक्टेड पॉलिसीच्या डिटेल्स मागवून घेतल्या होत्या. दरम्यान, निवा बुपा हेल्थ इन्श्योरन्स कंपनीचे प्रतिनिधी संजय कुमार यांनी ASP ला माहिती दिली की मेरठ येथील मुकेश चंद सिंघल यांच्याकडे 64 विमा पॉलिसी आहेत. या सर्व पॉलिसी 2018 ते 2023 दरम्यान काढण्यात आल्या होत्या.
याच काळात, विशाल नावाच्या एका तरुणाने 25 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 दरम्यान लोनवर टोयोटा लेजेंडर, निसान मॅग्नाइट, ब्रेझा आणि रॉयल एनफील्ड अशा चार गाड्या खरेदी केल्या. शिवाय, मुकेश महिन्याला फक्त 25,000 रुपये कमवत असल्याची माहिती आहे. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मुकेशवर संशय व्यक्त केला. पुढील तपासादरम्यान, विशालच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याला त्या सर्वांच्या विम्याचे पैसे मिळाले होते, अशी माहिती समोर आली.
चार वेळा लग्न केलं
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विशालने चार वेळा लग्न केलं असल्याचं समोर आलं. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीच्या आणि त्याच्या आईच्या विमा पॉलिसींमधून 1.5 कोटी रुपये मिळाले होते. तसेच, वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला दोन पॉलिसींमधून 50 लाख मिळाले. त्याच्याकडे आणखी 62 पॉलिसींमधून अंदाजे 50 कोटी रुपये होते.