नातवाने आजीवर केला बलात्कार, नंतर नाक आणि तोंडाचा चावा घेत केली निर्घृण हत्या; हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : एका नराधम युवकाने आपल्या आजीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौकशीत आरोपीने दिलेल्या माहितीने पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नातवाने आजीवर केला बलात्कार
नाक आणि तोंडाचा चावा घेत केली निर्घृण हत्या
हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : आपल्या समाजात नाती, माणुसकी शिल्लक आहे का असा प्रश्न पडावा अशी घटना समोर आली आहे. लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकत-ऐकत आपण मोठे होतो. या गोष्टींमधून आपण चांगला माणूस व्हावं, सर्वांशी आपुलकीनं, प्रेमानं वागावं असे संस्कार आजी आपल्यावर करते. मात्र याच आजीवर नातवाने वाईट नजर ठेवली तर? किती भयानक आहे हे. पण हे प्रत्यक्षात घडलंय. एका नराधम युवकाने आपल्याच चुलत आजीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ही घटना आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक के.एल. बंजारे यांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, बुधवारी सकाळी डायल-112 वर माहिती मिळाली होती की, घाटाखेडी गावात एका वृद्ध महिलेवर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी वृद्धेला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : कोल्हापुरातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजच्या विभागप्रमुखाला अटक, 20 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप
मध्येच पार्टी सोडून गेला आणि...
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एफएसएल आणि फिंगरप्रिंट पथकाच्या मदतीने पुरावे गोळा केले. फिर्यादीने (आरोपीचा चुलता) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान शेतात खाण्यापिण्याची पार्टी सुरू होती, ज्यात आरोपी रामनिवास ऊर्फ रायसिंग याच्यासोबत पप्पू भील आणि सुनील भील हे देखील सहभागी झाले होते. फिर्यादी आपल्या वृद्ध आईला शेतातील झोपडीत एकटे सोडून या पार्टीत गेला होता. काही वेळानंतर आरोपी रामनिवास कोणालाही काहीही न सांगता तिथून निघून गेला. सकाळी जेव्हा फिर्यादी आपल्या आईला पाहण्यासाठी झोपडीत पोहोचला, तेव्हा ती तिथे नव्हती. शोध घेतला असता जवळच असलेल्या गव्हाच्या शेतात ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होते आणि जबड्यावर जखमेच्या खुणा होत्या. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी वृद्ध महिला सापडली, तिथेच रामनिवासचे कपडेही पडलेले होते.










