प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या! मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला अन्... धक्कादायक घटना

मुंबई तक

पत्नीने आपल्या प्रियकरासोबत योजना आखून पतीची निर्घृण हत्या केली आणि नंतर त्याच्या मृतदेहाची विचित्र पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला अन्...
मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या!

point

मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला अन्...

Murder Case: तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील गोबीचेट्टीपलयम येथे एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी पत्नीने आपल्या प्रियकरासोबत योजना आखून पतीची निर्घृण हत्या केली आणि नंतर त्याच्या मृतदेहाची विचित्र पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. नेमकं प्रकरण काय?

गोबीचेट्टीपलयम येथील इलुर परिसरात नेहमीप्रमाणे शेतातून जात असताना काही गावकऱ्यांना जमिनीच्या आतून एक मानवी पाय बाहेर पडताना दिसला. सुरुवातीला कोणालाच यावर विश्वास बसला नाही, परंतु जवळून पाहिल्यावर तो एका मृतदेहाचा भाग असल्याचं स्पष्ट झालं. या घटनेमुळे घाबरलेल्या गावकऱ्यांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली.

प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला मृतदेह  

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं. काही वेळातच मातीखाली प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला एक कुजलेला मृतदेह आढळला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आणि त्यांनी प्राथमिक पोस्टमॉर्टम तपासणी केली. एखादी जड वस्तू डोक्यावर मारल्याने मृत तरुणाचा मृत्यू झाल्याचं रिपोर्ट्समध्ये दिसून आलं . यावरून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

पत्नीवर आला संशय  

हा मृतदेह इलूर येथील रहिवासी चिन्नाराजचा असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी लगेच त्याच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली. चौकशी केली असता, त्याची पत्नी अम्मासी हिने सांगितलं की तिचा पती बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता होता आणि ती तिच्या कुटुंबियांसोबत त्याचा शोध घेत होते. पण तिच्या बोलण्यावर आणि वागण्यावर पोलिसांना संशय आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp