बळीराजा नैराश्यात, मुलाच्या आत्महत्येनंतर बापाने जीव सोडला, धुळ्यात शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं

मुंबई तक

Nanded Farmer Ended his life : बळीराजा नैराश्यात, मुलाच्या आत्महत्येनंतर बापाने जीव सोडला, धुळ्यात शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बळीराजा नैराश्यात, मुलाच्या आत्महत्येनंतर बापाने जीव सोडला

point

धुळ्यात शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं

नांदेड : महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य उद्धवस्त झालंय. हातातोंडाशी आलेला घास महापूराने हेरावून घेतल्याने बळीराजा नैराश्यात गेल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नांदेडमधील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर बापाचा देखील 12 तासांच्या मृ्त्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदेडशिवाय धुळ्यातील शेतकऱ्याने देखील कापसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.  निवृत्ती कदम असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.  

धुळ्यात विषारी औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या 

अतिपावसाने कापसाचे पीक वाया गेल्याने नैराश्येत गेलेल्या  एका शेतकऱ्याने शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावात घडली आहे. युवराज काशिनाथ कोळी या 40 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात फवारणीसाठी असलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने केवळ कुरखळी गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे, शिरपूर तालुक्यात सहा दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

हेही वाचा : कल्याणमधील शाळेत कपाळावर टिळा अन् टिकली लावण्यास बंदी? चारी बाजूंनी टीका झाल्यानंतर शाळेचं स्पष्टीकरण

धुळ्यातील युवराज कोळी यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता, कापसाच्या पिकावर यावर्षी सुरुवातीला त्यांनी आपल्या क्षेत्रात कापसाची लागवड केली.परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली. फुलोरा व फळे गळून पडल्याने कापसाचे उत्पादन होणार नाही. हे स्पष्ट झाल्यावर कर्जाचे ओझे आणि पोटापाण्याची चिंता त्यांच्या मनावर दाटून आली, मुलींच्या लग्न कसं करावं? या नैराश्यग्रस्त अवस्थेत त्यांनी शेतातच फवारणीचे औषध प्राशन करून जीवन संपवले,

हे वाचलं का?

    follow whatsapp