मद्यधुंद अवस्थेत तरुणाने आईचीच केली हत्या, नेमकं काय घडलं?
Crime News : नवरात्रौत्सवात मद्यधुंद तरुणाने आपल्याच आईची हत्या केली आहे. त्यानंतर वडिलांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर तरुण फरार झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मद्यधुंद तरुणाने आईची केली हत्या

बहिणीच्या लग्नावरूनच कुटुंबात वाद

नेमकं काय घडलं?
Crime News : नवरात्रौत्सवात मद्यधुंद तरुणाने आपल्याच आईची हत्या केली आहे. त्यानंतर वडिलांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर तरुण फरार झाल्याची माहिती समोर आली. ही घटना बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील राहमुरहरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मदारीपूर कर्ण गावातील आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थ देखील हादरून गेले आहेत. आरोपी मुलाचं नाव नाव गुड्डू असे आहे.
हे ही वाचा : 'शपथ घेतो की महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जावू देणार नाही ...' ठाकरेंच्या शिवसेनेचा काटा आणणारा दसरा मेळावा टीझर
नेमकं काय घडलं?
या घडलेल्या घटनेबाबत ग्रामस्थ अमरेंद्र कुमार यांनी सांगितलं की, सोमवारी गुड्डू नावाचा तरुण मद्यवस्थेत आपल्या पत्नीला मारहाण करत होता. तेव्हा दोघांची भांडणे सोडवण्यास गेलेले वडील आंद्रदीप साहनी यांनाही मारहाण करत जखमी केले. तेव्हाच तरुणाची आई मीना देवी (वय 45) तिला वाचवण्यासाठी गेली असता, तरुणाने रागाच्या भरात आपल्या आईवर लाठीकाठीने हल्ला केला आणि या हल्ल्यात आईचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बहिणीच्या लग्नावरूनच कुटुंबात वाद
गुड्डूचे मागील वर्षीच विवाह झाला होता, तसेच त्याला एक मुलगीही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीच्या लग्नावरूनच कुटुंबात सतत वाद व्हायचा. आरोपीचे मागील वर्षी विवाह झाला होता, त्याला एक मुलगी देखील आहे. दरम्यान, मुलाने आईचा खून केल्याबाबतची माहिती पोलिसांना कळताच ते घटनास्थळी आले.
हे ही वाचा : गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात, रिक्षांना धडक देत 3 जण गंभीर जखमी, अपघातादरम्यान ती...
त्याने मृत महिला मीनाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. अशातच आरोपीचा लहान भाऊ राजेश कुमार हा मुंबईत कामगार म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणात स्टेशन हाऊस ऑफिसर शिवेंद्र नारायण सिंह यांनी सांगितलं की, शवविच्छेदन तपासणीनंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपण्यात आला. संबंधित प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.