आई झाल्यानंतर वजन खूप वाढलं! पतीला खटकलं अन् रागाच्या भरात पत्नीसोबत केलं भयानक कृत्य...

मुंबई तक

महिलेचं वजन वाढल्यामुळे तिच्यासोबत भयानक घटना घडल्याची एक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

रागाच्या भरात पत्नीसोबत केलं भयानक कृत्य
रागाच्या भरात पत्नीसोबत केलं भयानक कृत्य
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आई झाल्यानंतर वजन खूप वाढलं!

point

पतीला खटकलं अन् रागाच्या भरात पत्नीसोबत ...

point

नेमकं काय घडलं?

Crime News: खरंतर, आई झाल्यानंतर महिलेचं वजन वाढणं ही एक सामान्य बाब आहे. त्यानंतर, वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण, महिलेचं वजन वाढल्यामुळे तिच्यासोबत भयानक घटना घडल्याची एक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील असल्याची माहिती आहे. येथे, एक महिला आई झाल्यानंतर तिचं वजन वाढलं आणि याच कारणामुळे तिच्या पतीला इतका त्रास झाला की त्याने आपल्या पत्नीचीच हत्या केली. नेमकं प्रकरण काय?

आई झाल्यानंतर वजन खूप वाढलं 

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या जून बुनयान नावाच्या 37 वर्षीय महिलेची ओळख 25 वर्षीय जोनाथन अँथनी रेंटेरियासोबत झाली. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लगेच एकमेकांसोबत लग्न केलं. त्यानंतर, जूनने एका मुलीला जन्म दिला. परंतु, आई झाल्यानंतर जूनचं वजन खूप वाढलं आणि यामुळेच जोनाथन आणि जून यांच्यात सतत वाद व्हायचे.

हे ही वाचा: तिन्ही मित्रांनी एकत्र नदीत उडी मारली अन् आयष्य संपवलं! इंस्टाग्राम रील की प्रेमसंबंध? नेमकं प्रकरण काय?

गळा दाबून निर्घृणपणे हत्या 

दरम्यान, जोनाथन जूनवर वजन कमी करण्यासाठी सतत दबाव आणायचा आणि या कारणावरून त्यांच्यात बऱ्याचदा भांडणं व्हायची. 11 सप्टेंबर रोजी, भांडण इतकं टोकाला पोहोचलं की जोनाथनने जूनचा गळा दाबून तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर आरोपी पती त्याच्या मुलीसोबत तिथून फरार झाला. नंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली आणि आरोपीला अटक करण्यात आली.

हे ही वाचा: कुणबी दाखले दिलेल्यांची संख्या मोजा, वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकर काय काय म्हणाले?

पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी जोनाथनने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याने जूनचा मागून गळा दाबून तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून टाकण्यात आल्याचं देखील आरोपीने सांगितलं. सध्या, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp