17 वर्षांच्या मुलीला गोळी मारली अन्... नंतर मृतदेह नदीत फेकला! तब्बल 5 दिवसांनंतर... वडिलांनी मुलीसोबत असं का केलं?
एका वडिलांनीच आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गोळी मारून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

17 वर्षांच्या मुलीला गोळी मारली अन्... नंतर मृतदेह नदीत फेकला!

वडिलांनी मुलीसोबत असं का केलं?
Crime News: मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका वडिलांनीच आपल्या 17 वर्षांच्या मुलीला गोळी मारून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकला. रविवारी पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. प्राथमिक तपासादरम्यान, वडिलांनी प्रतिष्ठेसाठी आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
आरोपीच्या शेजाऱ्यांनी दिली माहिती...
संबंधित प्रकरणाबाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या केल्याच्या पाच दिवसांनंतर, रविवारी गलेठा गावाजवळील क्वारी नदीतून दिव्या नावाच्या मुलीचा मृतदेह आढळला. प्रकरणातील आरोपीची मोठी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आणि त्यानंतर, शनिवारी भरत उर्फ बंटू सिकरवारला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना या प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी सिकरवारच्या घरातून गोळीबाराचे आवाज आणि आरडाओरडा ऐकत येत होता.
हे ही वाचा: मुंबई: रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने पत्नीची केली निर्घृण हत्या! अधिक काळापासून वेगळे... नेमकं प्रकरण काय?
पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न
संबंधित घटना 23 सप्टेंबर रोजी रात्री मुरैना शहराच्या अंबाह बायपास परिसरातील आरोपीच्या घरी घडली. प्रकरणातील मृत मुलगी 12 वी इयत्तेत शिकत होती, अशी माहिती आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम करत असल्यामुळे पीडितेचे आरोपी वडील अतिशय नाराज होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांना सुरुवातीला दिव्या नेमकी कुठे आहे? या प्रश्नावर टाळाटाळ करणारी उत्तरे दिली पण चौकशी केल्यावर घरातील सीलिंग फॅन मुलीच्या अंगावर पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोपीने दावा केला.
हे ही वाचा: दुबईहून पती घरी परतला, पत्नीसोबत खोलीचा आतला दरवाजा बंद केला अन्... सकाळी वडील घरी आले अन् ‘त्या’ अवस्थेत...
मृतदेह नदीत फेकला
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने घटनेच्या चार तासांनंतर त्याच्या मूळ गावी, गलेठा येथील क्वारी नदीत त्याच्या मुलीचा मृतदेह फेकून दिल्याचं आरोपीने सांगितलं. गावात सर्वत्र या ऑनर किलिंगची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी शनिवारी SDRF च्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्यास सुरूवात केली. रविवारी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आणि सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेह दगडाने बांधून नदीत फेकण्यात आला आल्याचं आढळून आलं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून रिपोर्ट्सच्या आधारे पोलीस कारवाई करत आहेत.