ऑनलाइन गेमिंगचा नाद लय बेकार! पाच लाख रुपये गमावून बसला, नंतर कर्ज फेडण्यासाठी रचला ‘तो’ खोटा बनाव...

मुंबई तक

सध्याचे तरुण हे केवळ एक हौस किंवा आवड म्हणून ऑनलाइन गेम्स खेळतात. पण, कालांतराने या ऑनलाइन गेमिंगचं व्यसन लागतं आणि यामुळे आयुष्य उद्धवस्त होऊन बसतं. अशीच एक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

ऑनलाइन गेमिंगचा नाद लय बेकार!
ऑनलाइन गेमिंगचा नाद लय बेकार!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाइन गेमिंगच्या नादात पाच लाख रुपये गमावून बसला

point

कर्ज फेडण्यासाठी रचला ‘तो’ खोटा बनाव...

Crime News: ऑनलाइन गेमिंगचा नाद अतिशय वाईट, कारण यामुळे होत्याचं नव्हतं होऊन बसतं, अशा बऱ्याच घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. खरंतर, सध्याचे तरुण हे केवळ एक हौस किंवा आवड म्हणून ऑनलाइन गेम्स खेळतात. पण, कालांतराने या ऑनलाइन गेमिंगचं व्यसन लागतं आणि यामुळे आयुष्य उद्धवस्त होऊन बसतं. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका तरुणाने ऑनलाइन गेममध्ये पाच लाख रुपये गमावले. त्याने हे पैसे उधार घेतले असल्याचं सांगितलं जात आहे. आता, कर्ज फेडण्यासाठी, त्याने एक अशी योजना आखली जी ऐकून प्रत्येकालाच मोठा धक्का बसेल. नेमकं काय घडलं?

20 लाख रुपयांची मागणी 

कर्जबाजारी झालेल्या या तरुणाने आधी स्वतःच्या अपहरणाची खोटी कहाणी रचली. नंतर त्याने स्वतःच्या कुटुंबियांकडून 20 लाख रुपयांची मागणी केली. पण त्याची ही योजना हाणून पाडण्यात आली आणि त्याचा खोटेपणा उघडकीस आला. पोलिसांना हिमाचल प्रदेशातील सोलन येथे त्या तरुणाचं लोकेशन सापडलं आणि तिथून त्याला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, कर्ज फेडण्यासाठी आणि मस्करी करण्यासाठी त्याने ही योजना आखल्याचं सांगितलं.

पोलिसांचा तपास  

मिळालेल्या माहितीनुसार, आशाराम नावाचा एक तरुण कासगंज येथून नोएडामध्ये आपल्या दाजीच्या घरी आला. त्यानंतर तो तिथून अचानक बेपत्ता झाला. 21 सप्टेंबर रोजी त्या तरुणाने आपलं अपहरण झाल्याची खोटा बनाव रचला. त्यानंतर स्वत:ला सोडवण्यासाठी कुटुंबियांकडून त्याने पैशांची मागणी केली आणि हिमाचलला पळून गेला. हिमाचल येथे यापूर्वी आरोपी तरुण नोकरी करत होता. संबंधित तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला सोलन येथून सुरक्षितपणे ताब्यात घेतलं आणि त्याची तुरुंगात रवानगी केली. संबंधित तरुणाकडून पोलिसांनी पाच एटीएम कार्ड, एक आधार कार्ड आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

हे ही वाचा: डोंबिवली: भंडाऱ्यात जेवला, हात धुवायला गेला आणि 13 वर्षाचा आयुष गमावून बसला जीव.. असं घडलं तरी काय?

आरोपीचे दाजी शिवम यांनी सांगितलं की, "मला व्हॉट्सअॅपवर एक फोटो आणि मॅसेज पाठवण्यात आला होता. त्यात आरोपी आशारामचे हातपाय बांधलेले आणि तोंडाला रुमाल बांधलेला दिसत होता. त्याला तिथून सोडवण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मी खूप घाबरलो आणि त्यांना पाच हजार रुपये पाठवले. अखेर, मी पोलिसांना सुद्धा याबाबतीत कळवलं."

हे वाचलं का?

    follow whatsapp