छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायले गेले, पण आक्रित घडलं, 4 जणांचा बुडून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News : दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायले गेले, पण आक्रित घडलं, 4 जणांचा बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

लिंबेजळगाव तलावातील बॅकवॉटरमध्ये चार मुलं बुडाले
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथून अतिशय हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने काही तरुण त्यांचा ट्रॅक्टर धुण्यासाठी तलावाजवळ गेले होते. मात्र, यावेळी चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दसऱ्याच्या निमित्ताने ही सर्व मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी लिंबेजळगाव तलावातील बॅकवॉटरमध्ये गेली होती. यावेळी एकामागून एक असे सर्व चार मुले पाण्यात बुडाली. मृत्यू पावलेली मुले वय वर्षे 9 ते 17 या वयोगटातील होती. या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
दसऱ्या दिवशीच कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
व्यंकटेश दत्तात्रय तारक (वय 11), इरफान इसाक शेख (वय 17), इम्रान इसाक शेख (वय 12) आणि जैनखान हयात खान पठाण (वय 9) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि मुलांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. दसऱ्याच्या दिवशीच या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : 'आमचं गुलामीचं गॅजेट, बरं मग इंग्रज काय तुमच्या..', जरांगेंचा पारा चढला, पंकजा मुंडेंना थेट सुनावलं!
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, मागील काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, तलाव, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतत आवाहन करण्यात येत आहे की, वाहत्या पाण्यात जाऊ नका आणि पाण्यात खेळण्याचे टाळा. यासंदर्भात अनेक इशारे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रसारित होत आहेत.