मीरा रोडमध्ये नवरात्रौत्सव सणाला गालबोट, गरबा खेळताना तरुणाने अंड फेकलं, रात्री नेमकं काय घडलं?
Meera Road News : मीरा रोडमध्ये गरबा सुरु असताना एका तरुणाने अंडी फेकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हा आरोपी एस्टेला या सोसायटीचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवरात्रौत्सव सणाला गालबोट

गरबा खेळताना तरुणाने फेकलं अंड

नेमकं काय घडलं?
Meera Road News : ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या सोसायटीत नवरात्रौत्सव सणाला गालबोट लागल्याचं प्रकरण समोर आलं आहे. गरब्याच्या कार्यक्रमादरम्यान, मोठा वाद उफळला. गरबा सुरु असताना एका तरुणाने अंडी फेकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हा आरोपी एस्टेला या सोसायटीचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय. तरुणावर काशिमिरा पोलिसांनी BNS 2023 कलम 300 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता घडली.
हे ही वाचा : 'मी शपथ घेतो 106 हुतात्म्याच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र दरोडेखोरांच्या...' ठाकरेंच्या शिवसेनेचा अंगावर काटा आणणारा दसरा मेळाव्याचा टीझर
गरबा सुरु असताना...
तरुण हा गरबा सुरु असताना मोबाईल घेऊन घटनास्थळी आला होता. तेव्हा त्याने साऊंडचे डेसिबलची तपासणी केली. गरबा खेळणाऱ्या लोकांचे व्हिडिओ काढून ते पोलिसांना दाखवण्यात आले होते. याआधी त्याने अनेकदा पोलिसांना फोन करून कार्यक्रम थांबवण्यास सांगितला होता. रात्रीच 11 वाजण्याच्या सुमारास तरुणाने गरबा सुरु असतानाच अंडे फेकले, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
अंड पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळच फुटलं
दरम्यान फेकण्यात आलेले अंडे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळच फुटल्याचं आढळून आलं होतं. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळलेली दिसून येत आहे. या प्रकरणात संबंधित तरुणाने अंडे फेकल्याचा आरोप स्थानिक करताना दिसतात. या प्रकरणी आता शिवसेना शाखा प्रमुख महेश शिंदेंसह इतर विविध हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झाल्या आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारची आणखी एक मोठी अट, सविस्तर माहिती एका क्लिकवर
पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीचा आणि स्थानिकांचा याआधीही वाद झाला होता, याच झालेल्या वादामुळे रहिवाशांशी वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.