भूषण गवई यांच्या आई RSS च्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या भावाने स्पष्टच सांगितलं

मुंबई तक

CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत की नाहीत? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या भावाने दिलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भूषण गवई यांच्या आई RSS च्या कार्यक्रमाला जाणार का?

point

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भावाने स्पष्टच सांगितलं

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदाच्या वर्षात 100 वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, अमरावतीतील संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई उपस्थित राहणार असल्याची पत्रिका व्हायरल होत होती. त्यामुळे भूषण गवई (Bhushan Gavai) यांच्या आई कमलाताई गवई या संघाच्या कार्यक्रमाला खरच उपस्थित राहणार आहेत का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर याबाबत भूषण गवई यांचे भाऊ राजेंद्र गवई (Rajendra Gavai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : अहिल्यानगरातील रस्त्यावर 'l Love Mohammad' रांगोळीवरून वाद, मुस्लिम जमाव एकवटला, पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

राजेंद्र गवई काय काय म्हणाले? 

राजेंद्र गवई म्हणाले, पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे. त्याचं निमंत्रण आईसाहेबांना भेटलेलं आहे. आईसाहेबांनी ते निमंत्रण त्यांनी स्वीकारलं आहे. विजयादशमीच्या कार्यक्रमानंतर हा कार्यक्रम आहे. संघाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहे. इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते.विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे संबंध होते. संबंध भावा भावांचे होते, परंतु विचारधारा ही वेगवेगळी होती. कार्यक्रमाला गेलं म्हणजे विचारधारा बदलेलं असं मुळीच नाही. एकमेकांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे, अशा मताचा मी आहे. 

हेही वाचा : VIDEO : तुमचं राजकारण नंतर करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना झाप झाप झापलं

हे वाचलं का?

    follow whatsapp