VIDEO : तुमचं राजकारण नंतर करा, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना झाप झाप झापलं

मुंबई तक

IAS Kumar Ashirwad and Jyoti Waghmare : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिंदेंच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना खडे बोल सुनावले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झापलंय

point

तुमचं राजकारण नंतर करा, असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले आहेत.

IAS Kumar Ashirwad and  Jyoti Waghmare, Solapur : गेल्या 15 दिवसांपासून सोलापूरसह मराठवाड्याला महापूराचा मोठा फटका बसलाय. ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. सीना नदीला आलेल्या महापूराने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हेरावून घेतलाय. दरम्यान, आता सोलापुरातील शेतकऱ्यांना आणि खेड्यातील लोकांना सर्वस्तरातून मदत करण्याच्या कार्याला अगोदर प्राध्यान्य दिले जात आहे.शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे व त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जाऊन खेड्या पाड्यातील लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत. या दरम्यान, ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन स्वत:ची फिजिती करुन घेतलीये. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात... 

हेही वाचा : Asia Cup 2025: पाकिस्तानला धूळ चारताच PM मोदींचं ट्विट, म्हणाले ‘Operation Sindoor आणि…’

जास्तीची मदत मिळावी, यासाठी ज्योती वाघमारेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन 

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाकडून अन्नधान्याचे किट वाटप केले जात होते. यावेळी ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना त्यांनी फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. "कलेक्टर साहेब, या गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे, प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहेत, असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी जास्तीची मदत मिळावी, अशी मागणी केली. 

हेही वाचा : Maharashtra हवामानाचा अंदाज: मराठवाड्याला पावसाचा पुन्हा अलर्ट, गरज असेल तरच घरातून बाहेर पडा!

हे वाचलं का?

    follow whatsapp