Maharashtra Weather: कोकणात पावसाची विश्रांती, मराठवाड्यात नेमका कसा असेल पाऊस?
Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 30 सप्टेंबर रोजी विविध उपविभागांनुसार काही अंशी पावसाचे प्रमाण असल्याची हवामान विभागाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

30 सप्टेंबर रोजी कशी असेल पावसाची स्थिती?
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 30 सप्टेंबर रोजी विविध उपविभागांनुसार पावसाचं प्रमाण असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. तर काही ठिकाणी राज्यातील विविध क्षेत्रानुसार हवामान विभागाचा अंदाज बदलणार असल्याची शक्यता आहे, त्याची एकूण माहिती ही पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा : डोंबिवली: भंडाऱ्यात जेवला, हात धुवायला गेला आणि 13 वर्षाचा आयुष गमावून बसला जीव.. असं घडलं तरी काय?
कोकण विभाग :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी हवामान विभागाने पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. या जिल्ह्यांना 30 सप्टेंबर दिवशी पावसाचा धोका नसेल असा अंदाज जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये अगदी हलक्या पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना पावसाचा कसलाही धोका निर्माण होणार नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्र या दोन्ही विभागातील जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा मान्सून आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांचा समावेश होता. या जिल्ह्यांपैकी नांदेडमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची सामान्य परिस्थिती दिसून येते.