Govt Job: रेल्वेमध्ये 2570 पदांसाठी बंपर भरती! ‘या’ पदांसाठी लवकरात लवकर करा अर्ज... काय आहे पात्रता?
रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून जूनिअर इंजीनिअर पदांवरील भरतीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रेल्वेमध्ये 2570 पदांसाठी बंपर भरती!

‘या’ पदांसाठी लवकरात लवकर करा अर्ज...
Govt Job: रेल्वेत नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून जूनिअर इंजीनिअर पदांवरील भरतीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. रेल्वेमध्ये एकूण 2570 जूनिअर इंजीनिअर पदांसाठी भरती निघाली असून यामध्ये डिपोट मटेरिअल सुपरिटेंडेंट आणि केमिकल अँड मेटालर्जिकल असिस्टंट या पदांचा समावेश आहे. रेल्वेच्या नवीन भरतीच्या नोटिफिकेशनची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार rrbapply.gov.in या रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून रेल्वेच्या विविध विभागांमध्ये जूनिअर इंजीनिअर पदांवर भरतीचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झाली असून उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे भारताच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्यूनिकेशन या क्षेत्रात डिग्री किंवा डिप्लोमाचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. तसेच, JE(IT) आणि केमिकल अँड मेटालर्जिकल असिस्टंट पदासाठी विशेष शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे.
हे ही वाचा: ऑनलाइन गेमिंगचा नाद लय बेकार! पाच लाख रुपये गमावून बसला, नंतर कर्ज फेडण्यासाठी रचला ‘तो’ खोटा बनाव...
वयोमर्यादा
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 या तारखेच्या आधारे, उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.