75 वर्षाच्या वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत विवाह उरकला, पण मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं?
75 वर्षाच्या वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत विवाह उरकला, पण मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूने गाठलं; नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

75 वर्षाच्या वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत विवाह उरकला

पण मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूने गाठलं
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एका 75 वर्षीय वृद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत लगीनगाठ बांधली. मात्र, मधुचंद्राच्या दुसऱ्याच दिवशी या वृद्धाचा मृत्यू झालाय. या वृद्धाने एक दिवस आधीच तीन मुलांची आई असलेल्या महिलेशी विवाह केला होता.
मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्धाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, गौराबाद शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुछमुछ गावातील एका वृद्धाने सोमवारी तीन मुलांची आई असलेल्या महिलेशी लग्न केले. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी पहाटे त्यांची तब्येत अचानक बिघडली. शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सगरू राम (वय 75) यांनी जवळपास 40 वर्षांपूर्वी बेलाव गावातील अनारी देवी यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला एकही अपत्य नव्हतं. वर्षभरापूर्वी आजारपणामुळे अनारी देवी यांचे निधन झाले. त्यानंतर सगरू राम एकटेच राहत होते.
ग्रामस्थांच्या मते, सगरू राम यांच्या नावावर सुमारे दोन 1.25 एकर जमीन व एक घर होते. दुसरीकडे, मनभावती (वय 35) हिच्या पतीचा सात वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता. तिला तीन मुलं देखील आहेत. दरम्यान सगरू राम आणि मनभावती एकमेकांच्या संपर्कात आले. नातं पुढे सरकल्यावर दोघांनी सोमवारी मंदिरात हिंदू पद्धतीनुसार विवाह केला. पत्नीच्या म्हणण्यानुसार, ती रात्री मुलीला घेऊन आत झोपायला गेली होती, तर सगरू राम दोन मुलांसह बाहेर झोपले होते.