Govt Job: भारतीय सैन्यात भरती व्हायचंय? मग ‘ही’ संधी अजिबात सोडू नका, काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महासंचालनालयाकडून ग्रुप सी अंतर्गत एलडीसी, फायरमन, स्टोअरकीपर, मशिनिस्ट, कुक, वेल्डर यासारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Govt Job: इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सैन्यात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महासंचालनालयाकडून ग्रुप सी अंतर्गत एलडीसी, फायरमन, स्टोअरकीपर, मशिनिस्ट, कुक, वेल्डर यासारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑफलाइन अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टने निर्धारित पत्त्यावर पाठवू शकतात.
वयोमर्यादा आणि पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित पदांनुसार पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी १०वी/मॅट्रिक्युलेशन/आयटीआय/१२वी उत्तीर्ण असण्यासोबतच त्यांच्याकडे पदानुसार संबंधित क्षेत्रात आयटीआय/बी.एससी इत्यादी डिग्री असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि किमाल 25 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: मुंबईतील वृद्ध नागरिकाला 70 लाख रुपयांना गंडा... भामट्यांनी सरकारी अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगितली अन्...
‘या’ पदांसाठी निघाली भरती
-
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): 2 पदे
फायरमन: 1 पद