2 ऑक्टोबर रोजी कोकण भागात पावसाची विश्रांती, तर मराठवाड्यात पावसाची स्थिती नेमकी कशी असेल?
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 2 ऑक्टोबर 2025 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार

2 ऑक्टोबर 2025 रोजी पावसाची परिस्थिती
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 2 ऑक्टोबर 2025 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असण्याची शक्यता आहे. या एकूण विभागात 2 ऑक्टोबर रोजी हवामानाची परिस्थिती कशी असेल याबाबत महत्त्वाची अपडेट पुढीलप्रमाणे नमूद केली आहे.
हे ही वाचा : बळीराजा नैराश्यात, मुलाच्या आत्महत्येनंतर बापाने जीव सोडला, धुळ्यात शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं
कोकण विभाग :
राज्यातील कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका नाही. हवामान विभागानुसार सध्या कोकणात पावसाची विश्रांती दिसून येईल.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. या पैकी नंदूरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यात हलक्या पावसासह विजांचा कडकडाट असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. या एकूण जिल्ह्यांपैकी बीड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर याच जिल्ह्यात नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.