दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे, प्रेयसीबाबत प्रियकराला भलतंच कळालं, नंतर प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल

मुंबई तक

Viral news : प्रियकराला प्रेयसीच्या लग्नाबाबत समजताच प्रियकराने विष पिऊन आत्महत्या केली आहे.

ADVERTISEMENT

viral news (grok)
viral news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीबाबत प्रियकाराला कळालं गुपित

point

प्रियकराने विष प्राशन करून उचललं टोकाचं पाऊल

point

नेमकं काय झालं?

Viral news : प्रेमात सर्वचजण वेडी होत असतात. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असते. पण त्याच प्रेयसीच्याबाबतीत प्रियकराला असं काही गुपित कळतं त्या गुपितामुळे त्यांच्यातील नातं लवकरच संपण्याची शक्यता असते. यामुळे प्रेमात बुडालेले तरुण आत्महत्येचे शिकार होतायत आणि आपला मोलाचा जीव गमावून बसतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशाहमध्ये घडली आहे. प्रियकराला आपल्याच प्रेयसीच्या लग्नाबाबतचं गुपित कळाल्याने प्रियकराने विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. 

हेही वाचा : 'हप्ता भर अन् बायकोला जा घेऊन...' कर्ज न फेडल्याने बँकेनं महिलेला सोडलंच नाही, पती विनंती करून दमला अखेर...

नेमकं काय घडलं ? 

हे प्रकरण बुलंदशहरातील पहसू पोलीस ठाणे परिसरातील फाजलपूर गावातील आहे. येथे रहिवासी असलेल्या 22 वर्षीय अरुण नावाच्या तरुणाने विष प्राशन केलं आहे. यामुळे अरुणची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्याची प्रकृती पाहून त्याला दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. उपचारादरम्यान, अरुणचा मृत्यू झाला. मृ्त्यू झालेल्या अरुणने पॉलेटेक्निकचं शिक्षण पूर्ण केले होते. तो एका कंपनीत अप्रेंटिशीप म्हणून कार्यरत होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कसलाही लेखी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. 

आत्महत्येचं कारण आलं समोर

संबंधित प्रकरणात अरुणच्या वडिलांनी सांगितलं की, बाजूच्या गावातील एका मुलीवर अरुणचं प्रेम होते. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचे दुसरीकडे लग्न ठरवून दिलं होतं. यामुळे अरुण हताश झाला होता, तो आपल्या प्रेयसीला कधीही विसरू शकत नव्हता. पण तो नेहमी दुखी असायचा. अरुणच्या मनात काय चालले आहे हे कळत नव्हते. प्रेयसीच्या लग्नाची बातमी ऐकल्याने त्याने विष प्राशन केलं. त्यानंतर त्याचा एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

हेही वाचा : लातूर हादरलं! पत्नीनं पतीला विचारला प्रश्न, उत्तर देण्याऐवजी पती संतापला अन् पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळलं

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. सीओ मधुप कुमार सिंह म्हणाले की, हे प्रकरण लक्षात घेतले असता, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही, दरम्यान, तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलीस म्हणाले.  

हे वाचलं का?

    follow whatsapp