65 वर्षाच्या वासनांध वृद्धाचा 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार.. चौकात विवस्त्रच सोडलं; सगळा प्रकार CCTV मध्ये कैद
बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यातील एका 20 वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग तरुणीवर 65 वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

65 वर्षीय वृद्धाने मतिमंद तरुणीवर केला बलात्कार

20 वर्षीय तरुणीसोबत 65 वर्षीय वृद्धाचं घाणेरडं कृत्य

CCTV फुटेजमध्ये स्पष्टच दिसलं
Rape Case: बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यातून संतापजनक बातमी समोर आली आहे. येथील गायघाट ब्लॉकमधील भुसारा चौकात गेल्या दोन दिवसांपासून राहत असलेल्या 20 वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग तरुणीवर 65 वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पुरुष तरुणीसोबत घाणेरडं कृत्य करताना दिसत आहे. पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे.
आरोपी वृद्धाचं नाव सकल पासवान असून पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी हरियाणामध्ये राहून मजूर म्हणून काम करतो. मागील आठवड्यातच तो त्याच्या गावी आला होता. पोलिसांनी पीडित तरुणीची एसकेएमसीएच मध्ये वैद्यकीय तपासणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
20 वर्षीय मतिमंद तरुणीसोबत घाणेरडं कृत्य
भुसारा चौकातील बाजारात एक किराणा दुकान आणि सीएसपी आहे. मंगळवारी (29 जुलै) सकाळी सीएसपी ऑपरेटर आला असता त्याला त्याचं काउंटर पडलेल्या अवस्थेत दिसलं. त्यावेळी त्याला रात्री चोर आला असावा, असा संशय आला. याच संशयावरून दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज तपासलं. फुटेज पाहून त्याला मोठा धक्का बसला. फुटेजमध्ये आरोपी सकल पासवान 20 वर्षीय मतिमंद तरुणीसोबत दुष्कृत्य करताना स्पष्ट दिसत होता.
हे ही वाचा: पत्नी आणि सासूला दगडाने ठेचून... नंतर घरामागे पुरलं अन् त्यावर केळीचं झाड; रचला भयानक कट
चौकात विवस्त्र अवस्थेत...
दरम्यान, बलात्कार झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या विकलांग तरुणी चौकात विवस्त्र अवस्थेत फिरत होती. तरुणीला त्या अवस्थेत पाहणाऱ्या लोकांना तिच्यासोबत काहीतरी भयानक घडल्याचा संशय आला. त्यानंतर स्थानिक महिलांनी पीडित तरुणीला कपडे घातले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, दुकानदाराने गायघाट पोलीस स्टेशनचे प्रभारी उमाकांत सिंग यांना फोन करून प्रकरणाची माहिती दिली.