Ajit Pawar: पवार कुटुंबियांनी घेतलं अजितदादांचं शेवटचं दर्शन, राजकीय नेत्यांची उपस्थिती...

काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत.

ADVERTISEMENT

social share
google news
विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार

1/8

काल म्हणजेच 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. 
 

हजारो मान्यवर नेते उपस्थित

2/8

त्यांच्या या अंत्यविधीसाठी हजारो मान्यवर नेते उपस्थित राहिले आहेत. दादांची अंत्ययात्रा निघताच कार्यकर्त्यांनी फोडला हंबरडा असून "अजित दादा अमर रहे", अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. 
 

लाडक्या बहिणी सुद्धा भावूक

3/8

तसेच, लाडक्या दादांच्या जाण्याने लाडक्या बहिणी सुद्धा भावूक झाल्या असून "अजितदादा, परत या" असा त्यांनी टाहो फोडला. 
 

अजितदादांवरील तिरंगा जय पवारांना सोपवण्यात आला

4/8

अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यविधींना सुरूवात झाल्यानंतर अजितदादांवरील तिरंगा जय पवारांना सोपवण्यात आला. तसेच, युगेंद्र पवार, रोहित पवार मंचावर देखील आले. 
 

ज्यातील नेतेमंडळी उपस्थित

5/8

अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील नेतेमंडळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. 
 

अजितदादांचं शेवटचं दर्शन

6/8

सुनेत्रा पवारांसह कुटुंबियांनी मंचावर येऊन अजितदादांचं शेवटचं दर्शन घेतलं. दरम्यान, शरद पवार देखील भावूक झाल्याचं दिसून येत आहे.
 

अमित शाह विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले

7/8

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी अमित शाह विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले असून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नंतर, त्यांनी मंचावर येऊन अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
 

इतर मंत्र्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली

8/8

 त्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून दादांना श्रद्धांजली वाहिली. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp