पुण्यात खळबळ! ज्योतिषाने विद्यार्थीनीला पडद्यामागे नेलं, जबरदस्तीने मिठी मारून अश्लील चाळे केले, पोलिसांनी धाड टाकताच..

मुंबई तक

पुण्यात एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. एका बोगस ज्योतिषाने लॉ शिक्षणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केला.

ADVERTISEMENT

Pune Astrologer Shocking Viral News
Pune Astrologer Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात ज्योतिषाने विद्यार्थीनीचा केला विनयभंग

point

पोलिसांनी आरोपी ज्योतिषाला केली अटक

point

अनेक महिलांचा विनयभंग केल्याचा संशय

Pune Shocking Viral News : पुण्यात एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. एका बोगस ज्योतिषाने लॉ शिक्षणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केला. नराधमाने जबरदस्तीने तिला मिठी मारून किस करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी ज्योतिषाला अटक केली आहे.  अखिलेश लक्ष्मण राजगुरु (45) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीचं सातारा रोडवर ज्योतिष कार्यालय आहे. 

संपूर्ण प्रकरण काय आहे?

ही धक्कादायक घटना 19 जुलैला घडली. जेव्हा आरोपीने त्याच्या भावाला एक खास झाड देण्यासाठी विद्यार्थीनीला ऑफिसमध्ये बोलावलं. विद्यार्थीनी तिथे पोहोचल्यावर राजगुरुने तिला रुममध्ये असलेल्या पडद्यामागे बोलावलं आणि डोक्यावर झाड ठेवून मंत्र बोलण्यास सांगितलं.

हे ही वाचा >> Mumbai Train Blast Case : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

जेव्हा विद्यार्थीनीला चुकीचं काहीतरी होत असल्याचं जाणवलं, तेव्हा ती निघून गेली. आरोपीने तिला जबरदस्ती पकडलं आणि अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थीनीने धाडस दाखवत आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि तातडीनं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तक्रार दाखल करून राजगुरुच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला अटक केली. 

अनेक महिलांचा विनयभंग केल्याचा संशय

पोलिसांना संशय आहे की, आरोपीने आधीही अशाप्रकारे इतर महिलांना निशाणा बनवलं असेल. ज्या महिला भीतीमुळे समोर येत नाहीत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल दौड यांनी म्हटलं की, पुढील तपास सुरु आहे आणि आरोपीला लवकरच कोर्टात हजर केलं जाईल. पोलिसांनी महिलांना आवाहन केलं आहे की, त्यांच्यासोबत असा विचित्र प्रकार घडला, तर त्यांनी तक्रार दाखल करावी. सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधीत कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> भयंकर! 20 रुपयांसाठी तरुणाने आपल्या आईवर कुऱ्हाडीने केला हल्ला, हादरवून टाकणारं कारण आलं समोर

हे वाचलं का?

    follow whatsapp