पुण्यात भोंदू ज्योतिषाने सोडली लाज, तरुणीला एकांतात बोलावले अन् थेट घट्ट मिठीच मारली

मुंबई तक

Pune Crime News : भोंदू जोतिषाने तरुणीला मंत्र देण्याच्या बहाण्याने एकांतात बोलावले आणि तरुणीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

pune crime news
pune crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भोंदू बाबांचे कारमाने उघड

point

तरुणीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न

point

नेमकं काय घडलं?

Pune Crime News : राज्यभरात आता भोंदू बाबांचे कारमाने उघड होऊ लागले आहेत. पुण्यात आणखी एका भोंदू ज्योतिषाने एक संतापजनक कृत्य केलेलं आहे. भोंदू जोतिषाने तरुणीला मंत्र देण्याच्या बहाण्याने एकांतात बोलावले आणि तरुणीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. संबधित प्रकरणात पोलिसांनी भोंदू ज्योतिषाला अटक केली आहे. पत्रिका बघून भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषानेच हे कृत्य केल्याचं बोललं जातंय. ही घटना पुण्यातील धनकवडी येथील आहे.  

हेही वाचा : महापालिका निवडणूक, ठाकरे बंधु एकत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव...उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सगळंच सांगितलं

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या ज्योतिषाचे अखिलेश लक्ष्मण राजगुरु असे नाव आहे. याविरोधात पीडितेनं सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घडलेल्या घटनेनुसार, पीडितेच्या तरुणीच्या मैत्रिणीने या ज्योतिषाकडे पत्रिका पाहून ये, हा ज्योतिषी भविष्य सांगतो असं सांगितलं होतं. तरुणी आपल्या भावाची पत्रिका घेऊन ज्योतिषाकडे गेली. पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने सांगितलं की, तुमच्या भावाला एक वनस्पती द्यावी लागेल आणि ती मागवल्यानंतरच तुम्हीही या, असं ज्योतिषानं सांगितलं. 

दुसऱ्याच दिवशी तरुणीने धनकवडी येथील सहकारनगर पोलीस ठाणे गाठलं आणि फिर्याद दाखल केली. तेव्हा ज्योतिषाने आणलेल्या वनस्पती तुमच्या डोक्यावर ठेऊन मंत्र म्हणावे लागतील, असं सांगितलं. तेव्हा तरुणीला यात काही तरी काळंबेरं असल्याचा संशय बळावला गेला. त्यावेळी पीडित तरुणीने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अचानकपणे या ज्योतिषाने तरुणीला मिठी मारली आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणीने त्या ठिकाणाहून पळ काढला. 

तक्रार दाखल करताच कार्यालयावर छापा : 

पीडित तरुणीने आपल्या भावाला घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच कार्यालयावर छापा टाकला आणि संबंधित ज्योतिषाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. 

हेही वाचा : मराठी भाषेचा वाद थेट लोकलमध्ये, महिला एकमेकांमध्ये भिडल्या, म्हणाल्या मराठी येत नसेल तर...व्हिडिओ तुफान व्हायरल

संबंधित प्रकरणाची माहिती देताना सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौड यांनी सांगितलं की, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. आता या भोंदू ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. त्याने इतर काही लोकांसोबतही अशी अश्लील कृत्य केली आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp