'ठाकरे बंधूची युती अन् मुंबई...' उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सगळंच सांगून टाकलं
Uddhav Thackeray Interviews : शिवसेना ( उबाठा ) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज 20 जुलै रोजी सामना या युट्यूब प्रसारमाध्यमावर प्रसारित झाला आहे. ही मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना ( उबाठा ) खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मराठी माणूस हिंदी सक्तीच्या विरोधात पेटून उठलाय?
महापालिकेच्या निवडणुकीत राज आणि उद्धव एकत्र येणार का?
Uddhav Thackeray Interviews : शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज 20 जुलै रोजी सामना या युट्यूब प्रसारमाध्यमावर प्रसारित झाला आहे. ही मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकार आणि पहलगाम हल्ल्याबाबत विचारले असता, उद्धव ठाकरेंनी केलेल्या हल्ल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारच्या कामगिरीला अपयश आल्याचं म्हणाले. तसेच त्यांनी महापालिका निवडणूक, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या विषयावर भाष्य केलं. तसेच त्यांनी अदानी प्रकल्प हा थेट धारावीवर कब्जा करत असून हा देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा लँड स्कॅम असल्याचं ते म्हणाले.
हेही वाचा : 'आता सोबत राजही आलेला आहे...', उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तेच म्हणाले; युतीबाबत नेमकं काय सुरू?
प्रश्न : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात आपल्या 26 माता भगिणींचं कुंकू पुसलं गेले त्यात आपल्या राज्यातीलही माता भगिणी होत्या, या हल्ल्याकडं आपण कसं पाहता?
हा हल्ला झाला कसा? काश्मीरमध्ये आता पूर्ववत परिस्थिती झालेली आहे. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच 370 कलम लागू करण्यासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. पर्यटक पुन्हा तिथं येऊ लागले होते. तिथं पुरेसा बंदोबस्त ठेवण्याची गरज होती. सुरक्षेच्याबाबतीत हे सर्व गाफिल राहिले. त्यानंतर सैन्यांनी जी काही कारवाई केली, त्यांच्या शौर्याला सलामच आहे. जे पर्यटक केले होते ते बिंधास्तपणे गेले होते. त्यावेळी आनंदाचे आणि सुखाचे क्षण घालवायला गेले होते. त्यांच्यावर गोळीबार होतो काय? इतक्या आतमध्ये अतिरेकी कसे आले? अतिरेक्यांचा अद्यापही थांग पत्ता नाही.
प्रश्न : हे सरकारचं अपयश आहे म्हणणं आहे का तुमचं?
होय...कारण त्यांच्याच भरोवशावर आपले नागरिक तिकडे गेले होते. ते म्हणतात की, आताचं काश्मीर वेगळं आहे, तेव्हाचं काश्मीर वेगळं होतं. त्यांनी काही केलं तर आम्ही त्यांना घुसून मारू. ते सैन्याचं काम आहे आणि सैन्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ, असे ते म्हणालेत.
प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सरकारमध्ये पठाणकोट झालं, त्यानंतर पुलवामा झालं, त्यानंतर पहलगाममध्ये झालेला हल्ला ऑपरेशन सिंदूर होतं आणि आपण त्याला पाठिंबा दिला?
हो पाठिंबा दिला होता...पाकिस्तानवरील हल्ल्याच्या अशा अनेक बातम्या आल्या होत्या. काही बातम्या अशा ही होत्या की आता आपण पाकिस्तान मोडूनच टाकणार आहोत. जसं त्यावेळी इंदिराजींनी बांगलादेश हा पाकिस्तानपासून तोडला तसाच पाकिस्तानचेही तुकडे होतायत की काय? असा प्रश्न निर्माण होतोय, पण तसं काही नाही झालं. तुम्ही तुमच्या डिप्लोमॅसीसाठी काहीही करणार. इकडे आपल्या समाजातील लोक तिकडे लढायला जातात आणि यांची मुलं तिकडे दुबईत जाऊन मस्त क्रिकेट मॅच बघतात. यामध्ये अनेक सैनिकांच्या जीवाशी खेळ खेळला गेला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्यामुळे युद्ध थांबल्याचं सांगितलं. मग आता यामागे नेमकं समजायचं काय? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. याविरोधात जर कोणी काही बोलेल तर आहेच जनसुरक्षा कायदा हे सर्व सुरूच आहे.










