'आता सोबत राजही आलेला आहे...', उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तेच म्हणाले; युतीबाबत नेमकं काय सुरू?
Uddhav Thackeray Interview: शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पुन्हा एकदा राज ठाकरे सोबत असल्याचा उल्लेख केला आहे. जाणून घ्या उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील फडणवीस सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जीआर मागे घेतल्यानंतर शिवसेना UBT आणि मनसे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत विजयी मेळावा घेतला होता. दरम्यान, त्या क्षणापासून उद्धव ठाकरे हे सातत्याने अनेक ठिकाणी उल्लेख करत आहेत. की, राज ठाकरे हे आता आमच्यासोबत आले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे हे याबाबत असा कोणताही उल्लेख उघडपणे करताना दिसत नाहीत. त्यामुळे ठाकरेंमध्ये युती होणार की नाही हा संभ्रम कायम आहे.
दरम्यान, असं असताना आज (19 जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक विशेष मुलाखत आज प्रसिद्ध झाली. जी खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
हे ही वाचा>> 'आम्ही मिटवून टाकली भांडणं, आलो ना दोघं भाऊ एकत्र...' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, पण...
मात्र, याच मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला की, राज ठाकरे हे आता सोबत आले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे हे सातत्याने असं म्हणत असले तरी दुसरीकडे मनसेच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की, केवळ मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र आहोत. निवडणुकीच्या युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
यामुळे आता उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने सातत्याने राज ठाकरे सोबत आले असल्याचं म्हणत आहेत त्यामागे नेमकं कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे याविषयी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.