मराठी भाषेचा वाद थेट लोकलमध्ये, महिला एकमेकांमध्ये भिडल्या, म्हणाल्या मराठी येत नसेल तर...व्हिडिओ तुफान व्हायरल

मुंबई तक

Viral Video : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलाच आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकमेकांत भिडलेल्या आहेत. जर मराठी बोलता येत नसेल तुमच्या राज्यात निघून जावा, असं म्हणत भांडताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

viral video marathi language debate live on local
viral video marathi language debate live on local
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मराठी अमराठी वाद

point

महिले एकमेकिंमध्ये भिडल्या, व्हिडिओ व्हायरल

Viral Video : राज्यातच नाही,तर देशभरात मराठी भाषेचा मुद्दा आता समोर येऊ लागलेला आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलाच आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकमेकांत भिडलेल्या आहेत. जर मराठी बोलता येत नसेल तुमच्या राज्यात निघून जावा, असं म्हणत भांडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : महापालिका निवडणूक, ठाकरे बंधु एकत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव...उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सगळंच सांगितलं

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने राज्यात हिंदी सक्तीबाबतचं धोरण राबवण्याचा निर्णय घेतला. त्याला शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवला. एवढंच नाही,तर उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जीआरची होळी केली. त्यानंतरच हा जीआर रद्द करण्यात आला होता. या निमित्ताने मनसेनं मीरा भाईंदर येथे पेढे वाटले आणि त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्यासोबत मराठी भाषेवरून वाद उफळला. या भाषेच्या मुद्दयावरून रान पेटण्यास मीरा भाईंदर येथूनच सुरुवात झाली.

त्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि मीरा भाईंदर येथे दुकानदारासोबत घडलेल्या घटनेचा निषेध केला. यानंतर मराठी एकिकरण समिती, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेते त्या ठिकाणी मोर्चात सामिल झाले. मोर्चा काढून दिला जाणार नाही, असं पोलिसांनी ठणकावून सांगितलं होतं. यावरूनच ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी मध्यरात्रीत 3 वाजता ताब्यातही घेण्यात आलं होतं. एका बाजूला व्यापाऱ्यांना मोर्चा काढून देता आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाला मोर्चा काढून दिला जात नाही असं का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

तेव्हापासून मराठी आणि अमराठी या वादाला तोंड फुटलं आहे. एवढंच काय तर दुसरीकडे झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मराठी भाषेवरून टीका टिप्पणी केली. त्यानंतरच मुंबईत पुन्हा मराठी माणूस पेटून उठला आहे. त्याचेच पडसाद हे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दिसून येत आहेत. 

मराठी अमराठी महिला लोकल ट्रेनमध्ये भिडल्या

महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, असं मराठी लोक आता अमराठींना आवाहन करत आहेत. मात्र, या आवाहनाला काही अमराठी भाषिक लोक चांगला प्रतिसाद देत आहेत, तर काही लोक मुजोरी दाखवत आहेत. हा मुद्दा केवळ राजकीय पटलावरच नाही,तर आता  मराठी माणसांच्या स्वाभिमानापर्यंत पोहोचला आहे. मुंबई रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणत परप्रांतीयांचा लोंढा वाहून येताना दिसतोय. मुंबईत लखनऊहून दररोज ट्रेन येते. यामुळे मुंबईतील मराठी माणसांचा टक्का घसरला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे परप्रांतियांनी मराठी शिकावं असं मराठी जणांचं म्हणणं आहे.

हेही वाचा : विकृतीचं टोक! व्हॅन ड्रायव्हरने चार वर्षांच्या मुलीलाही सोडलं नाही, बसमध्येच केलं लैंगिक शोषण, गुप्तांगाला झाल्या वेदना

अशीच घटना एका लोकल ट्रेनमध्ये घडली आहे. मराठी महिलांचा आणि अमराठी महिलांचा काही करणावरून वाद झाला. तो वाद थेट भाषेपर्यंत पोहोचला आहे. एक मराठी महिला ही काही परप्रांतीय महिलांना मराठी भाषा शिका नाहीतर इथून निघून जा, असं म्हणत आपला संताप व्यक्त करत आहे. संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दोन्ही बाजूच्या महिला एकमेकांमध्ये भिडताना दिसत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp