'शेजारीणीला गरोदर कर..' पत्नीने पतीला भलतंच सांगितलं, कपलचा Viral Video पाहून तुम्हीही...
Married Couple Shocking Video Viral : पती-पत्नीच्या नात्यात प्रेम कमी झालं की, दोघांमध्ये अनेक गोष्टींबाबत मतभेद निर्माण होतात. पती-पत्नीच्या भांडणाचे भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कपलचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही बसला धक्का

पत्नीने पतीला दिला आगळावेगळा सल्ला

व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
Married Couple Shocking Video Viral : पती-पत्नीच्या नात्यात प्रेम कमी झालं की, दोघांमध्ये अनेक गोष्टींबाबत मतभेद निर्माण होतात. पती-पत्नीच्या भांडणाचे भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. पण एका दाम्पत्याच्या व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, एक पत्नी तिच्या पतीला विचित्र सल्ला देते. शेजारच्या बाईला प्रेग्नंट करण्यासाठी पत्नी पतीला सांगते. पत्नीचं म्हणणं ऐकल्यावर पतीलाही धक्का बसतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. पण यामागचं सत्य जाणून तुम्हालाही धक्काच बसेल.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @shimlagirlviyankaofficial नावाच्या यूजरने शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पती आरामात मोबाईल पाहत असतो. तेव्हा पत्नी अचानक रुममध्ये पोहोचते आणि पतीला सांगते, तुम्ही शेजारच्या महिलेला प्रेग्नंट करा. पतीला धक्का बसतो आणि तो पत्नीला रागात म्हणतो, वेडी झाली आहेस का..काय बोलतेस तू..त्यानंतर महिला पतीला मारत बोलते, यामध्ये काय वेडेपणा आहे. तिला कर प्रेग्नंट..मी पार्सल घेऊन आले आहे. माझं यूपीआय काम करत नाही. त्यामुळे तू तिला प्रेग्नंट कर. महिलेचं ऐकून पतीला धक्का बसतो. तो तिला म्हणतो, त्याला प्रेग्नंट नाही, पेमेंट म्हणतात.
कपलचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही बसला धक्का
हे ही वाचा >> 'आता सोबत राजही आलेला आहे...', उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तेच म्हणाले; युतीबाबत नेमकं काय सुरू?
व्हायरल झालेला हा व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करण्याच्या हेतुने बनवण्यात आला आहे. या व्हिडीओची कॉन्सेप्ट भाभीजी घरपर है या सीरियलमधून घेण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 83 लाथ व्ह्यूज मिळाले आहेत. एक लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: MHADA Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, पाहा कसा भरायचा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख
तसच अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. या व्हिडीओ व्हिडीओला कमेंट करत एका यूजरने म्हटलंय की, तुला यूपीआय माहितेय, मग पेमेंट का नाही माहिती..दुसऱ्या एका यूजरने म्हटलं,. बरं आहे पतीला इंग्रजी येते, नाहीतर तो शेजारच्या महिलेकडेच गेला असता.