मुंबईची खबर:MHADA Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, पाहा कसा भरायचा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख

मुंबई तक

म्हाडा (MHADA) च्या कोकण मंडळातर्फे जवळपास 5 हजांराहून अधिक घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडा (MHADA Konkan Lottery 2025 Advertisement) च्या या लॉटरीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

MHADA ची 5 हजारहून अधिक घरांसाठी मोठी लॉटरी...
MHADA ची 5 हजारहून अधिक घरांसाठी मोठी लॉटरी...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

MHADA ची 5 हजारहून अधिक घरांसाठी मोठी लॉटरी

point

मुंबईत निघाली MHADA ची 5,285 फ्लॅट्सची सोडत

point

या सोडतीसाठी कधी आणि कसा कराल अर्ज?

MHADA Lottery: मुंबईत हक्काचं घर खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एका आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा (MHADA) च्या कोकण मंडळातर्फे जवळपास 5 हजांराहून अधिक घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडा (MHADA Konkan Lottery 2025 Advertisement) च्या या लॉटरीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी नागरिक ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करू शकतात. ही लॉटरी वेगवेगळ्या योजनांअंतर्गत काढली जाईल. यात 77 भूखंड (जमिनीचे भाग) असून एकूण 5,285 फ्लॅट्ससाठी ही सोडत काढली जाईल.

कोणत्या शहरात मिळतील घरं? 

या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे शहर आणि जिल्हा तसेच वसईच्या वेगवेगळ्या हाउसिंग स्किम्सला अनुसरून फ्लॅट्स मिळतील. याव्यतिरिक्त, सिंधुदुर्गच्या ओरोस आणि कुळगाव- बदलापुरमध्ये 77 भूखंड विकण्यासाठी उपलब्ध आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाने ही लॉटरी 5 भागात विभागली आहे. 

20 टक्के सर्वसमावेशक योजनेत 565 फ्लॅट्स आहेत आणि15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेत 3002 फ्लॅट्स आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,677 फ्लॅट्स जसेच्या तसे उपलब्ध असतील. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (50 टक्के परवडणारे फ्लॅट्स) च्या अंतर्गत 41 फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

हे ही वाचा: Personal Finance: रोज करा 121 रुपयांची बचत अन् मिळवा 27 लाख रुपये, हा LIC प्लॅन खूपच सॉलिड!

म्हाडाच्या या लॉटरीसाठी आवश्यक तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची सुरूवात: 14 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
  • अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख:  14 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
  • लॉटरीसाठी पात्र लोकांची पहिली लिस्ट: 21 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6 वाजता
  • दावे आणि हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025, सायंकाळी 6 वाजता
  • पात्र लोकांची अंतिम लिस्ट: 1 सप्टेंबर 2025, सायंकाळी 6 वाजता
  • म्हाडाच्या लॉटरीचा लकी ड्रॉ: 3 सप्टेंबर 2025, सकाळी 10 वाजता (ठिकाण: काशिनाथ घाणेकर नाट्यगृह)

म्हाडाच्या लॉटरीसाठी कसा कराल अर्ज? 

म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी लक्षपूर्वक वाचा. अर्ज करताना, सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या भरा. अर्ज तपासणीनंतर पात्र अर्ज असलेल्या नागरिकांची कंप्यूटरच्या माध्यमातून लॉटरी काढली जाईल. कोकण मंडळाची ही सोडत IHLMS 2.0 संगणक प्रणाली आणि अॅपद्वारे काढली जाईल. या सोडतीसाठी अर्ज 14 जुलै रोजी दुपारी 1 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा: सुनेकडे प्रचंड वासनेने पाहणाऱ्या सासऱ्याने स्वत:च्याच मुलाला 'असं' संपवलं, समोर आली Inside Story

हे वाचलं का?

    follow whatsapp