सांगली: सासू-सुनेचा मृत्यू तर पिता-पुत्राची अवस्था गंभीर.. 'त्या' घरात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Sangli Crime: सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील सासू-सून यांचा मृत्यू झाला असून तर पिता आणि पुत्राची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

सांगलीमधील धक्कादायक घटना
सांगलीमधील धक्कादायक घटना
social share
google news

प्रबोधिनी चिखलीकर, सांगली: एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे. ज्यामध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला असून दोन पुरूषांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावात ही गंभीर घटना घडली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झालेला असून, या कुटुंबातील बाप आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. या दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय 45 वर्ष) आणि सून काजल समीर पाटील (वय 30 वर्ष) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यांची प्रकृती गंभीर आहे.

हे ही वाचा>> सुनेकडे प्रचंड वासनेने पाहणाऱ्या सासऱ्याने स्वत:च्याच मुलाला 'असं' संपवलं, समोर आली Inside Story

घटनास्थळी जत व कवठेमहांकाळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन केले असावे असा पोलिसांचा कयास आहे. 

नांगोळे या गावांमध्ये पाटील कुटुंबीयांचे ढालगाव रस्त्यालगत घर आहे. या घरामध्ये अल्लाउद्दीन पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील, काजल समीर पाटील व दोन लहान मुले असे कुटुंबीय राहतात. या घरामध्ये आज (19 जुलै) सकाळच्या सुमारास पाटील यांच्या शेजारच्या कुटुंबातील एका वयस्कर महिलेने घरातील चौघेजण निपचित पडलेले आहेत हे पाहिल्यानंतर आरडाओरडा करून, शेजारी राहणाऱ्या सर्वांना बोलविले.

हे वाचलं का?

    follow whatsapp