सुनेकडे प्रचंड वासनेने पाहणाऱ्या सासऱ्याने स्वत:च्याच मुलाला 'असं' संपवलं, समोर आली Inside Story
उत्तर प्रदेशातील आग्रामधून सुनेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका पित्याने आपल्याच मुलाची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुनेच्या प्रेमात पडलेल्या सासऱ्याने स्वत:च्याच मुलाला संपवलं

सुनेवरच्या प्रेमामुळे केली मुलाचीच हत्या अन्...

उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटना
Crime News: सध्या, प्रेमसंबंधांतून बऱ्याच धक्कादायक करणाऱ्या घटना घडल्याचं समोर येतं जसे की, कधी कोणाचा खून तर कधी स्वत:चं आयुष्य संपवणं. उत्तर प्रदेशातील आगरामधून सुद्धा अशीच एक चकित करणारी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुनेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका पित्याने आपल्याच मुलाची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तब्बल 4 महिन्यांनंतर पोलिसांना हे प्रकरण सोडवण्यात यश आलं. शुक्रवारी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांनी आधी मुलाच्या छातीवर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला आणि त्याच्या जखमेत काडतूस घातला. नंतर मुलानेच स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सुनेच्या प्रेमात पडला सासरा
आग्रामध्ये जगदीशपुरा पोलीस स्टेशन परिसरातील लडमडा गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. याच गावाचा रहिवासी असलेला चरण सिंग नावाचा व्यक्ती आपला मुलगा पुष्पेंद्र सिंगसोबत राहत होता. मुलाच्या लग्नानंतर चरण सिंगला आपली सून आवडायला लागली. त्याचं तिच्या सुनेवर प्रेम जडलं. मात्र, मुलाला या गोष्टीची माहिती मिळताच त्याचा प्रचंड संताप झाला आणि त्याने या सगळ्याला विरोध केला.
या प्रकारामुळे पुष्पेंद्र आपल्या वडिलांचं घर सोडून पत्नीसोबत मथुरामध्ये राहायला गेला. 14 मार्च रोजी होळी सणाच्या दिवशी पुष्पेंद्र होळी साजरी करण्यासाठी पत्नीसोबत आपल्या वडिलांच्या घरी आला.
होळीच्या दिवशी केली मुलाची हत्या
पुष्पेंद्र आपल्या पत्नीसोबत होळी खेळण्यासाठी घरी आल्यानंतर त्याचे वडील चरण सिंगने पुन्हा आपल्या सुनेशी असभ्य वर्तन केले. याच गोष्टीवर मुलगा आणि वडिलांमध्ये मोठा वाद सुरू झाला. त्यावेळी संतापलेल्या वडिलांनी आपला मुलगा पुष्पेंद्रच्या छातीवर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला आणि या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला.