बड्या कंपनीच्या CEO चं HR हेडशी होतं लफडं..कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये करत होते रोमान्स! Video व्हायरल झाला अन्..
Astronomer CEO video with HC Chief :ऑफिसमध्ये अफेअरची अनेक प्रकरणं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहेत. एका बड्या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आणि त्याच कंपनीच्या एचआर हेडच्या प्रेमकहाणीचा भन्नाट किस्सा व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सीईओ एंडी बायरन आणि एचआर केबॉटचा तो व्हिडीओ व्हायरल

कोल्ड प्ले कॉन्सर्टमध्ये नेमकं घडलं तरी काय?

कोल्डप्ले सिंगर क्रिस मार्टिनने सर्वांसमोर केली पोलखोल
Astronomer CEO video with HC Chief :ऑफिसमध्ये अफेअरची अनेक प्रकरणं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहेत. एका बड्या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ आणि त्याच कंपनीच्या एचआर हेडच्या प्रेमकहाणीचा भन्नाट किस्सा व्हायरल झाला आहे. दोघांमध्ये खूप दिवसांपासून गुपचूप अफेअर सुरु होता. एका म्यूझिक कॉन्सर्ट दरम्यान दोघांची पोलखोल झाली. दोघांचा रोमॅन्टिक व्हिडीओ एका कॅमेरात कैद झाला. अमेरिकेच्या बोस्टन येथील गिलेट स्टेडियमची ही घटना आहे. जिथे एका कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये या कपलचा रोमॅन्टिक क्षण कॅमेरात कैद झाला. दोघांचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कोल्ड प्ले कॉन्सर्टमध्ये नेमकं घडलं तरी काय?
कॉन्सर्ट सुरु असताना 'किस कॅम' स्क्रीनवर एस्ट्रोनोमर कंपनीचे सीईओ एंडी बायरन आणि एचआर केबॉट रोमॅन्टिक मूडमध्ये असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळालं. स्क्रीनवर आपला लाईव्ह व्हिडीओ सुरु आहे, हे जेव्हा त्यांनी पाहिलं, तेव्हा दोघांनीही कॅमेरापासून लपण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत सर्व प्रेक्षकांनी स्क्रीनवर त्यांना पाहिलं होतं.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: MHADA Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, पाहा कसा भरायचा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख
Coldplay चे सिंगर क्रिस मार्टिन स्टेजवरच म्हटलं की, ओह! पाहा या दोघांना..एकतर हे अफेअरमध्ये आहेत किंवा खूप लाजत आहेत. हे ऐकताच तिथे असलेल्या हजारो लोकांमध्ये एकच हशा पिकला. बघता बघता ही व्हिडीओ क्लिप इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली.
या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी एंडी बायरनच्या पत्नीविषयी सहानुभूती दर्शवली आहे. तर काहींनी या कपलला बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं, सीईओच्या पत्नीसाठी दु:खद..पण चांगलं झालं की, सर्वांसमोर आलं. अन्य एका नेटकऱ्याने लिहिलं, जर अफेअर आहे, तर कॉन्सर्टसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाणं किती मूर्खपणा आहे. याप्रकरणी एंडी बायरन आणि केबॉट यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.