Pune-Nashik एक्सप्रेस वे: गुड न्यूज आहे बरं का! तब्बल 2.5 तास वाचणार आहेत तुमचे!
पुणे-नाशिक महामार्गाची शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल मंजूरी मिळाल्यानंतर, एक्सप्रेसवेचं काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे-नाशिक महामार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार

प्रवासासाठी लागणार वेळ कमी होणार

महामार्ग प्रकल्पाबाबत सरकारने दिली मोठी अपडेट
Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने सरकारचा एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एक्सप्रेसवेची योजना शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल मंजूरी मिळाल्यानंतर, महामार्गाचं काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रश्न विचारला असता महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती सांगितलं. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास केवळ 2.30 ते 3 तासांमध्ये करता येईल. ज्यामुळे दोन्ही शहरांमधील उद्योग, वाहतूक आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठा फायदा होईल.
हे ही वाचा: मुंबईची खबर: MHADA Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी लॉटरी, पाहा कसा भरायचा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख
मजबूत औद्योगिक कॉरिडॉर
पुणे-नाशिक एक्सप्रेसवे दोन्ही शहरांना जोडण्यासोबत एक मजबूत औद्योगिक कॉरिडॉर तयार करण्यास फायदेशीर ठरेल. यामुळे बऱ्याच लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल आणि रोजगार देखील वाढेल. हा महामार्ग अनेक तीर्थस्थळांना जोडण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे. या एक्सप्रेसवेच्या प्रोजेक्टसंदर्भात (अलाइनमेंट) काही टेक्निकल बाबींवर काम सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
हे ही वाचा: सांगली हादरलं, संपूर्ण कुटुंब घरात पडलेलं निपचित, सासू-सुनेचा मृत्यू तर पिता-पुत्राची अवस्था गंभीर.. नेमकं काय घडलं?
मागील वर्षीच मिळाली मंजुरी
सरकारने मागील वर्षीच फ्रेब्रुवारी महिन्यात पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रोजेक्टला मंजूरी दिली होती. हा हायवे सूरत-चेन्नई महामार्गाला देखील जोडला जाईल. या प्रोजेक्टचा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांना देखील फायदा होणार आहे. हा महामार्ग जवळपास 133 किमी लांबीचा असेल. या एक्सप्रेस वे प्रोजेक्टचं काम पुढील 3 वर्षात पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पासाठी 1545 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. अहिल्यानगर आणि नाशिक सारखी शहरे महाराष्ट्राची प्रमुख आर्थिक केंद्रे असल्याने या एक्सप्रेसवेमुळे या भागातील औद्योगिक उपक्रमांना एक नवीन विस्तार मिळेल.