Sangli News : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या (Sangli District Primary Teachers Bank) सभेत शिक्षकांनी प्रचंड राडा केला आहे. त्यांचे वर्तन पाहून गुरूजींनाच धडे देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्व साधारण सभा (General Meeting) होती. या बँकेच्या सभेच्या अध्यक्षस्थानी विनायक शिंदे होते. सभेत झालेल्या राड्यावरून राडा घालण्याची तयारी शिक्षकांनी आधीच केली होती अशी भावना व्यक्त केले होते.
सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर
या सभेसाठी विरोधक सर्व तयारी निशी सभेच्या ठिकाणी आले होते. त्यांनी आापल्या सोबत विविध फलक ही आणले होते. सभा सुरू झाल्यापासूनच शिक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधकांनी घोषणाबाजी करताच सत्ताधाऱ्यांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
हे ही वाचा >> डिलिव्हरी बॉय बनला आधी रुग्ण, नंतर थेट चाकू काढला आणि डॉक्टरानाच…
एकमेकांशी झोंबा झोंबी
विरोधक व्यासीठासमोर आले व एकमेकांशी अगदी झोंबा झोंबी करू लागले. त्या गोंधळातच कोणीतरी व्यासपीठाच्या दिशेने अंडी फेकली गेली. त्यावरूनच दोन्ही गटात मोठा राडा सुरु झाला. आणि त्यानंतर विरोधक शिक्षकांनी सभात्याग केला. विरोधक बाहेर निघून गेल्यानंतर सभेचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले.
अंडी फेकली कोणी
प्राथमिक शिक्षक बँकेची सभा असल्याने पेशाने शिक्षख असणारेच या सभेसाठी उपस्थित होते. मात्र सभा चालू झाल्यानंतर आणि वाद प्रतिवाद केल्यानंतर मात्र अंडी फेकण्यात आली होती. त्यामुळे सभेच्या ठिकाणी अंडी आणली कुणी असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
हे ही वाचा >> ‘आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही’, माजी प्राध्यापिकेला का हवंय इच्छामरण?
शिक्षक बँकेची सभा आणि राडा
प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभा असल्या की अनेक वेळा राडा झाल्याचेच चित्र पाहायला मिळते. अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सभेवेळी शिक्षक शांततेने चर्चा न करता एकमेकांना भिडतानाच दिसत असतात. त्यामुळे शिक्षक बॅंकेच्या सभेनंतर मात्र शिक्षकानाच खरा धडे देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत राहते.