श्रावणात नॉनव्हेज आणि दारू का सोडतात, एवढं जरूर काय असतं यामध्ये?
श्रावणात मांसाहारी पदार्थ आणि मद्य सोडण्यामागे अनेक धार्मिक, वैज्ञानिक और सामाजिक कारणे सांगितली गेली आहेत. यामागची वैज्ञानिक कारणे सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
श्रावणात मांसाहारी पदार्थ आणि मद्य का सोडतात?
यामागे नेमकी काय कारणं आहेत?
Shravan Month Rules: श्रावण हा पवित्र महिना असल्याचं मानलं जातं. तसेच, शास्त्रात या महिन्यात मद्य आणि मांसाहारी पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या महिन्यात मद्य आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे, असं विज्ञानात देखील सांगितलं गेलं आहे. श्रावणात मांसाहारी पदार्थ आणि मद्य सोडण्यामागे अनेक धार्मिक, वैज्ञानिक और सामाजिक कारणे सांगितली गेली आहेत.
पावसाळ्यात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व असतात. या ऋतूमध्ये हवामानातील आर्द्रता वाढते आणि संसर्गाचा धोका खूप जास्त असतो. या काळात मांसामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. ते लवकर कुजते आणि दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
ब्रीडींगचा महिना
पावसाळा हा माशांच्या प्रजनन म्हणजेच ब्रीडींगचा काळ असतो. अनेक राज्यांमध्ये सरकार या काळात मासे न पकडण्याचे निर्देश देतात. आरोग्यतज्ज्ञ देखील या ऋतूमध्ये मासे न खाण्याचा सल्ला देतात. यामागे बरीच कारणे आहेत. पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण वाढते. पाण्यात बॅक्टेरियांची संख्या वाढते. परिणामी, माशांच्या माध्यमातून मनुष्यामध्ये संसर्ग पसरून उलट्या आणि जुलाब होण्याचा धोका असतो.
पावसाळ्याचा ऋतू माशांसाठी प्रजनन काळ असतो. या काळात त्यांच्यात अनेक बदल होतात. हे बदल माशांच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. माशांच्या सेवानाने रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते.










