मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? रेल्वे विभागाचा मोठा निर्णय...

मुंबई तक

सकाळी ऑफिसच्या वेळेत आणि ऑफिस सुटण्याच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये होत असलेली गर्दी बऱ्याचदा जीवघेणी ठरल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. याबाबत मध्य रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने ऑफिसच्या वेळेत बदल करण्याची मागणी कार्यालयांकडे केली आहे.

ADVERTISEMENT

लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? ऑफिसची वेळ बदलण्याची रेल्वेची मागणी....
लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? ऑफिसची वेळ बदलण्याची रेल्वेची मागणी....
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासंदर्भात रेल्वेचा निर्णय

point

ऑफिसची वेळ बदलण्याची रेल्वेची मागणी

Mumbai News: लोकल ट्रेन हा मुंबईतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचं सांगितलं जातं. दररोज जवळपास 1810 लोकल ट्रेनमधून सुमारे 35 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. कमी वेळेत आणि कमी पैशांत हवं ते ठिकाण गाठण्यासाठी मुंबईकरांना ट्रेनचा प्रवास सोयीस्कर वाटतो. पण लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे आता लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. सकाळी ऑफिसच्या वेळेत आणि संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी ट्रेनमध्ये उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन मध्ये रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने जवळपास 800 कार्यालयात याबाबत लेटर पाठवलं आहे आणि त्यात ऑफिसची वेळ मागे-पुढे करा, जेणेकरुन एकाच वेळी ट्रेनमध्ये गर्दी होणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे. 

कोणत्या कार्यालयात पाठवले लेटर्स

रेल्वेने केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, कॉरपोरेट ऑफिस, बँक, कॉलेज, म्यूनिसिपल ऑफिस आणि इतर बऱ्याच सरकारी आणि खाजगी संस्थांना लेटर पाठवण्यात आलं आहे. रेल्वेने केलेल्या मागणीनुसार, ऑफिसच्या वेळेत थोडा बदल करावा, जसे काही ऑफिस सकाळी लवकर, तर काही थोडे उशिरा सुरू करावेत.

दररोज सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 वेळेत ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. अशावेळी ट्रेनमध्ये चढणं आणि उतरणं अतिशय अवघड होऊन बसतं. रेल्वे विभागाच्या मते, ऑफिसच्या वेळेत बदल केल्यानंतर या वेळेतील गर्दी बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते. 

हे ही वाचा: बेवफा गर्लफ्रेंड! खरं प्रेम करूनही दिला धोका.. पहिल्या प्रियकराने दुसऱ्याचा गेमच केला, नंतर घडलं भयंकर

नवीन रेल्वे लाइन बनणण्यात अडथळा...

लोकल ट्रेन हा सर्वसामान्यांसाठी प्रवासाचा स्वस्त आणि चांगला पर्याय ठरतो. खरंतर, दिवसेंदिवस मुंबईच्या लोकसंख्येत भर पडत आहे. त्यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकलची गर्दी जीवघेणी ठरल्याच्या बऱ्याच बातम्या पाहायला मिळतात. रेल्वेसुद्धा या समस्येवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु सीएसएमटी ते कल्याण दरम्यान नवीन लोकल रेल्वेसाठी जागा शिल्लक नसल्याने नवीन लोकल ट्रेन जोडणे शक्य नाही.

हे ही वाचा: व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी, मग मराठी माणसाला परवानगी का नाही? मीरा रोडवर मराठी माणूस पेटून उठला

ऑफिसची वेळ बदलल्याने गर्दीचा प्रश्न सुटेल...

रेल्वे विभागाच्या मते, ऑफिसची वेळ बदलल्यास ट्रेनची गर्दी कमी होईल. यामुळे ट्रेनच्या वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात टळतील आणि त्यासोबतच प्रवास सुद्धा आरामदायी होईल. खरंतर, घड्याळ्याच्या काट्यावर फिरणारं शहर म्हणून ख्याती असलेल्या मुंबईमध्ये ट्रेनच्या या निर्णयामुळे मोठा बदल होऊ शकतो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp