दोन बायकांचा एकच नवरा! ‘ही’ अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uttar Pradesh News : मध्य प्रदेशातील (Uttar Pradesh) उज्जैनमधून (Ujjain News) एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. उज्जैनमध्ये दोन बायकांचा एकच पती आहे. यावरून त्या व्यक्तीच्या कुटुंबात गेल्या 15 वर्षांपासून वाद सुरू होता. न्यायालयात गेल्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं आहे. यानंतर हा वाद कौटुंबिक समुपदेशन केंद्राने (Family Counseling Centre) असा हाताळला की, ज्यानंतर पतीला दोन्ही पत्नींसोबत राहता येईल अशी तरतूद करण्यात आली. परंतु त्यासाठी पतीला कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या काही अटींचं पालन करावं लागेल. (1 husband 2 wifes if this condition of family counseling center is accepted by him then he can leave with both)

ADVERTISEMENT

कौटुंबिक समुपदेशन केंद्राने वादाचं निवारण करण्यासाठी एक फॉर्म्यूला तयार केला. हा 15-15 दिवसांचा फॉर्म्यूला आहे. या अंतर्गत पतीला 15 दिवस एका पत्नीसोबत आणि उर्वरित 15 दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहावं लागेल. पतीला दोन्ही पत्नींची काळजी घ्यावी लागेल आणि खर्च उचलावा लागेल. हा धक्कादायक विचित्र तोडगा पती आणि त्याच्या दोन्ही पत्नींनी मान्य केला.

Sanjay Raut on Nitin Desai: ‘सनी देओलचं घर वाचलं, मग नितीन देसाईंचा…’, राऊतांचा घणाघात

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा व्यक्ती आणि त्याच्या दोन पत्नींमध्ये हा वाद गेल्या 15 वर्षांपासून न्यायालयात सुरू होता. त्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला की, या व्यक्तीला त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहावे लागेल. मात्र हा निर्णय येईपर्यंत त्याच्या आयुष्यात दुसऱ्या पत्नीची एन्ट्री झाली. तिला त्याच्याकडून दोन मुलं होती. पण न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिली पत्नी पतीच्या घरी आली आणि त्यानंतर कुटुंबात कलह निर्माण झाला.

हे वाचलं का?

दुसऱ्या पत्नीने गाठलं पोलीस ठाणे… प्रकरण थेट कुटुंब समुपदेशन केंद्रात दाखल

पहिली पत्नी घरी आल्याने दुसरी पत्नी आणि तिच्या दोन मुलांनी महिला पोलीस ठाणे गाठले. येथे पोलिसांनी तिघांनाही कुटुंब समुपदेशन केंद्रात पाठवले. दुसरी पत्नी तिच्या हक्काची मागणी करत म्हणाली की, जेवढा हक्क पहिल्या पत्नीचा आहे तितकाच अधिकार माझा आणि माझ्या मुलांचाही आहे. दोन्ही पत्नींपैकी कोणीही पतीला सोडायला तयार नव्हतं.

Gold-Silver Rate: सोन्यापेक्षा चांदी महागली.. नेमकं असं घडलं तरी काय?

दोघींनी, पतीने त्यांच्यासोबत राहावं असा आग्रह धरला होता. यावर समुपदेशन केंद्रात प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेर महिलेचा पती पहिल्या पत्नीसोबत 15 दिवस आणि उर्वरित 15 दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या या निर्णयाला पती आणि दोन्ही पत्नींनीही संमती दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT