Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कडाडले! मुंबईसह 'या' शहरांमधील गोल्ड रेट वाचून डोकंच धराल
Today Gold Rate Updates: सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज गुरुवारी 28 नोव्हेंबरलाही सोन्याचा भावात मोठी उलथापालथ झालीय. मागील एक आठवड्यापासून सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नसराईच्या हंगामात सोनं गडगडलं!

मुंबईत सोन्याच्या 1 तोळ्याचा भाव काय?

...म्हणून सोन्याच्या दरात झाली मोठी वाढ
Today Gold Rate: सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं समोर आलं आहे. आज गुरुवारी 28 नोव्हेंबरलाही सोन्याचा भावात मोठी उलथापालथ झालीय. मागील एक आठवड्यापासून सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. काल बुधवारी 27 नोव्हेंबरच्या तुलनेत सोन्याचे आजचे भाव 300 रुपयांनी वाढले आहेत. लग्नसराईत सोनं स्वस्त होण्याची शक्यता कमीच आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोनं-चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजारांच्या पुढे गेलीय. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजारांच्या पुढे आहे.
मुंबई
मुंबईत सोन्याच्या 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमची किंमत 77510 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71050 रुपये झालीय.
दिल्ली
दिल्लीत सोन्याच्या 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमची किंमत 77660 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71200 रुपये झालीय.
कोलकाता
कोलकातामध्ये सोन्याच्या 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमची किंमत 77510 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71050 रुपये झालीय.