Washim news : वाशिमचा सुपुत्र सीमेवर शहीद, शिरपूरवर शोककळा
Indian Army : वाशिम जिल्ह्यातील शिरपूरमधील जवान आकाश अधागळे या जवानाचा कर्तव्यावर असताना दरीत पडून मृत्यू झाला. मंगळवारी त्याचा मृतदेह त्याच्या गावी येणार आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली होती.
ADVERTISEMENT
Indian Army : काही दिवसांपूर्वीच लेहमध्ये कर्तव्य बजावत असताना खिडकीतून पडून वाशिम जिल्ह्यातील भारतीय लष्कराचा जवान गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत आकाश अधागळे हा जवानाचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावचे ते रहिवासी होते. मंगळवारी त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी येणार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना समजताच कुटुंबीयांवर व गावावर शोककळा पसरली होती.
ADVERTISEMENT
डोंगरावरून थेट दरीत
आकाश अधागळे हे 2009 मध्ये भारतीय सैन्य दला दाखल झाले होते. त्यांनी महार रेजिमेंटमध्ये गेली 14 वर्षे देशाची सेवा बजावली होती. 6 सप्टेंबर रोजी ते लेहमध्ये सेवा बजावत असताना ते इमारतीच्या खिडकीतून खाली पडले होते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
पडल्यानंतर त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका’, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…
कुटुंबीयांना मानसिक धक्का
आकाश अधागळे यांचे पार्थिव मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी त्यांच्या गावी आणण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आकाश अधागळे यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. शहीद जवान आकाश अधागळे यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई, पत्नी आणि 4 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्यांचा लहान भाऊ देखील भारतीय सैन्यात देशसेवा बजावत आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Renu Sinha Murder : रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह, सुप्रीम कोर्टातील वकिलाची कुणी केली हत्या?
शहीद जवानाच्या वाटेकडे डोळे
गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र 10 सप्टेंबर रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. 32 वर्षीय शहीद जवान आकाश यांचे पार्थिव मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी त्यांच्या गावी आणण्यात येणार असून, अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवान आकाश अधागळे यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई, पत्नी आणि ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.त्याचा लहान भाऊ देखील भारतीय सैन्यात देशसेवा करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT